Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नेहमीसारखेच - २

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Mon, 03/07/2011 - 07:53
नेहमीसारखेच - १ नेहमीसारखेच - २ आजही पहिले तिला खिडकीत बसलेले... अगदी नेहमीसारखेच... आजही तिने कटाक्षाने माझे कटाक्ष टाळले... अगदी नेहमीसारखेच... कसे जमते तुला गं... इतके अलिप्त भाव चेह-यावर... इतकी स्तब्ध नजर क्षितिजावर... मनातील खळबळ मनातच लपवून... डोळ्यांमध्ये मात्र ही अजोड अनभिज्ञता... तू आणतेस तरी कुठून गं... मग मि ही अंमळ त्राग्याने... नजर फिरवू लागतो... परंतु...नजर फिरवता फिरवता.... हलकेच... डोळ्यांच्या कोनांतून स्पर्शून जाते... तेच तुझे.....जीवघेणे.... अबोध प्रेमाची कबुली देणारे... मंदमधुर हास्य.....नेहमीसारखेच..... अगदी नेहमीसारखेच.... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०७/०३/२०११)

Book traversal links for नेहमीसारखेच - २

  • ‹ नेहमीसारखेच - १
  • Up
  • नेहमीसारखेच - ३ ›

प्रतिक्रिया द्या
1569 वाचन

💬 प्रतिसाद (3)
न
निनाव Mon, 03/07/2011 - 08:08 नवीन
भन्नाटच. खूप आवडली. इतके अलिप्त भाव चेह-यावर... इतकी स्तब्ध नजर क्षितिजावर... मनातील खळबळ मनातच लपवून... डोळ्यांमध्ये मात्र ही अजोड अनभिज्ञता... खूपच सही.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/07/2011 - 11:30 नवीन
कविता अतिशय छान .. आवडली एकदम .. सोप्या शब्दांना ही खुपच छान पद्धतीने लिहिले आहे. विशेष करुन - >> स्तब्ध नजर , अजोड अनभिज्ञता... अबोध प्रेम मंदमधुर हास्य.....
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 03/07/2011 - 12:01 नवीन
मस्त जम्लिये :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा