अन्तर्नाद
रातीच्या अंधारात, खुणावती वेणुची साद,
सुरांनी तिच्या जागला , जागला अन्तर्नाद,
धुक्याची ही वाट नेते, कालिंदीच्या तीरी,
वाट पाहतो ग तिथे , माझा श्रीहरी
तो श्याम सावळा, मी बावरी ग राधा,
पाहण्या श्रुन्गार चोरुन, चांद उगवला आधा,
गळले देहाचे बन्धन, खुण अंतरीची पटे,
श्याम झाला राधा, राधा श्यामच वाटे,
माझी गोरी ही काया, श्याम रंगात न्हाली,
सावळ्या हरीच्या स्पर्शाने, राधा सावळी झाली.
💬 प्रतिसाद
(2)
ग
गणेशा
Mon, 03/07/2011 - 11:18
नवीन
आल्हाद सावळ्या स्पर्शाची छान शब्दरचना
- Log in or register to post comments
प
प्रास
Mon, 03/07/2011 - 11:19
नवीन
अत्यंत मोजक्या शब्दात, आशय छान व्यक्त झालाय....
आवडलीय.....
:-)
- Log in or register to post comments