Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रीशिवरायाचा जयकार

ज — जातीवंत भटका, Mon, 03/07/2011 - 12:07
श्रीशिवरायाचा जयकार सह्याद्रीवर घुमतो अजून तुझ्या शौर्याचा हुंकार ... श्वासाश्वासातून निघतो श्रीशिवरायाचा जयकार ... म्लेंच्छांनी घातले घाव घाव मातृभूमी वरी .. परदास्याच्या अंधःकारातून पेटला स्वातंत्र्याचा रवी ... घेऊनी रामदासी मंत्र गर्जला हा नृसिंह असा ... दुमदूमला आसमंत सारा थरथरल्या दाही दिशा ... मावळे मराठे मर्द झुंजले अर्पुनी प्राण ... रोवले छातीत मोघलांच्या तेजस्वी भगवे निशाण ... तासिले कडे अभेद्य घडविले दुर्ग बेलाग ... सळसळती मनगटे मराठी अन् समशेर ओकते आग ... हिंदवी स्वराज्याचा ज्यानी थाटला संसार साजरा ... त्या जाणत्या राजांस करितो मानाचा त्रिवार मुजरा ... --- वेडा कवी - अमोल

प्रतिक्रिया द्या
2153 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ज
ज्ञानराम Mon, 03/07/2011 - 12:11 नवीन
खूपच छान
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/07/2011 - 12:19 नवीन
अप्रतिम कविता .. मावळे मराठे मर्द झुंजले अर्पुनी प्राण ... रोवले छातीत मोघलांच्या तेजस्वी भगवे निशाण ... तासिले कडे अभेद्य घडविले दुर्ग बेलाग ... सळसळती मनगटे मराठी अन् समशेर ओकते आग ... जबरदस्त आहे हे...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 03/07/2011 - 12:46 नवीन
जबरा, जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 03/07/2011 - 14:26 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 03/07/2011 - 14:30 नवीन
वीर रसातील अतिशय सुंदर कविता ..
  • Log in or register to post comments
S
sneharani Tue, 03/08/2011 - 06:53 नवीन
सुरेख कविता! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा