पाककृती

वेज प्लॅटर

Primary tabs

Image removed. वर दिलेल्या भाज्या वापरुन मला वेज प्लॅटर करुन हवय. माझ्यामते ऑलिव्ह ऑइलात भाज्या फ्राय करुन त्यावर त्यावर मिठ व काळी मिरी भुरभुरावी मग बटर सोडावे. पण भाज्या एवढ्याने शिजतिल कश्या हा माझा प्रश्न आहे. जाणकारांनी क्रुपया मर्गदर्शन करावे.
चित्रा

माझ्या मते वर दिलेले आहे तेच वेज प्लॅटर आहे.
बाकी मी या भाज्या जास्त शिजवत नाही. तशाच चांगल्या लागतात. (विशेषतः गाजरे) बटरची सुद्धा गरज आहे असे नाही.

(अवांतर - चुचु यांचा धागा, आणि एकही प्रतिसाद नाही? बहुतेक हे काय झाडपाला खायचे म्हणून सगळे पळून गेले असावे)

पण ह्याला अजिबात तेल/बटर लागलेले दिसत नहिये. मी जे रेस्तरांमध्ये खाल्लय ते जरा तेलावर परतल्यासारखे दिसते.

चित्रा

माझ्या माहितीप्रमाणे याला बटर लावत नसतेच. हे असे मध्ये ठेवतात, आणि त्याला थोडे डिप लावून खायचे. गप्पा मारीत खाण्यासाठी (बटाट्याच्या चिप्स/वेफर्सना) चांगला पर्याय आहे.

दुसरा तसाच प्रकार म्हणजे या भाज्या चायनीज लोक नुसत्या किंचित वाफवून खातात (मला वाटते याबद्दल प्रदीप सांगू शकतील).

सहज

चित्र जालावरुन.

थोड्यावेळ भाज्या स्टीम करा मग ओलीव्ह ऑइल, मीठ मिरपूड टाकून टॉस करा.

सगळं शिकवावे लागते ह्या बैला!

सहजने आयुश्यात पहिल्यांदा काहितरी निट सुचवलेय म्हणूण त्यांचे अभिनंदन ;)
चित्राताई ह्या पध्दतिने करुन पहा एकदम मस्त लागते ;)

सविता

>>सगळं शिकवावे लागते ह्या "बैला"!

काय हे प्राणिवाचक उद्गार!!!! छे छे छे........

वरच्या सहज-स्टीमरमध्ये सगळ्यात वरच्या कप्प्यात सामन माश्याचे तुकडे आहेत काय?:)
केवळ माश्यावर फोकस्ड,
पिडांर्जुन

विजुभाऊ

पिडांर्जुन

या शब्दाचा उच्चार कसा करयचा ते सांगाल का हो शुद्धलेखन राश्ट्रपती पिडां काका
:::पिडांर्जुन काकाचा आश्रमतील सहाध्यायी विजुभाऊ

गणपा

एक ब्रोकली आणि फ्लॉवर सोडला तर बाकी भाज्या कच्याच खाल्या तरी चालण्या सारख्या आहेत.
बाकी सहज काकांनी उपाय सांगीतलाच आहे. ;)

गॅण्प्झ.. सहजने परफेक्ट सांगितलेय. मी ह्यात बेबीकॉर्न पण घातलेला खाउन पाहिलाय.

कुंदन

"गॅण्प्झ" ......
काय खरे नाहि बुवा....

धमाल मुलगा

ला-हौल-विलाकुवत!

(धूमचकाट पळून गेल्याची स्मायली.)

ज्ञानेश...

"गॅण्प्झ" आणि "ध्म्स" हे दोन अनोखे शब्द सापडले.
चुचुआजींचा धागा उघडल्याचे सार्थक झाले.

रमताराम

वारुणिबरोबर वेज-प्लॅटर? परा हल्ली रोजे चालू आहेत की काय?

अवलिया

वा वा

चुचुने धागा काढला तर.... छान छान !!

रमताराम

चुचुने धागा काढला आहे म्हणून चान चान म्हणावेच लागते आहे.

आत्मशून्य

.

पैसा

काय चुचु, वेज प्लॅटर झाला की नाही करून?

सगळ्या भाज्या आणुन झाल्या. प्लॅटरच्या तयारीला लागले तर नवर्याचा फोन आला कि २ जण जेवायला येत आहेत.
मग सॅन्डविच, वरण भात, बुन्द्दी रायता, पापड करुन वेळ मारुन नेली. ह्या नवर्यांच्या तर....

We are Cool as Vodka,Hard as Tequila,Warm as Cognac,Exotic as Malibu,Mixed as a Cocktail & as Special as a Champagne.Cheers to us.....!!!!!

रेवती

प्लॅटरच्या तयारीला लागले तर नवर्याचा फोन आला कि २ जण जेवायला येत आहेत.
अर्रर्रर्र.....
पण स्वयंपाक तर छान झालेला कळतोय. जाऊ द्या मॅडम्.....उद्या करा व्हेज प्लॅटर!

सुहास..

वेलकम बॅक ग चुचु !!

वरील प्रकार व्हेज फ्लॅटर नाहीये !! ते व्हे़ज सॅलॅड विथ मियानॉईज आहे ..असो ..व्हेज फ्लॅटर मध्ये दोन प्रकार असतात ..एक म्हणजे तन्दुरी आणि स्टिम्ड !!

वर अर्ध-बल्लवाचार्य सहज काकाने ;) दिलेले म्हणजे स्टिम्ड करुन मग वरुन मिठ -मिरेपुड टाकुन एखाद्या पातेल्यात हलवुन घ्यायचे , परतावायचे नाही ...

दुसरे म्हणजे तन्दुरी स्टाईल ..यात काही भाज्या शिजवुन मग ग्रील करतात ..सर्व एकत्र करत नाहीत ..सेपरेट सजवायच्या असल्याने सर्व सेपरेट शॅलो फ्राय करायच्या असतात.

बाकी झोपाळा तुटला की काय ;)

शोनू

अशा प्लॅटरमधल्या भाज्या साधारणपणे कच्च्याच खायच्या असतात. क्वचित अस्पॅरॅगस जरासे वाफवलेले असतात. पण टॉमेटो, भोपळी मिरच्या, फ्लावर, ब्रॉकोली हे सर्व कच्चेच .
मधलं डिप वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. सावर क्रीम, ग्रीक योगर्ट, मेयोनेज यापैकी काहीतरी एकाचा बेस. त्यात आपले आवडते सीझनिंग्स/ हर्ब्स घालून डिप्स करू शकता.

विजुभाऊ

म्ल व्ट्ले की चुचू नी कायतरी झक्कास शिजवले असेल.
बघतो तर काय वेगळेच.
अवांतर : काहीच नाही .