गण: देव गौरीनंदन आधी वंदुया
गण: देव गौरीनंदन आधी वंदुया
(चाल पारंपरीक)
देव गौरीनंदन आधी वंदुया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ||
रसीक जमले आम्हांसमोरी
तुझेच रूप जणू शेंदरी
उशीर नका लावू देवा
झडकरी या या
शुभ कार्याची सुरूवात करूया ||१||
रिद्धी सिद्धीचा तु रे स्वामी
तुज पुजीतो कलावंत आम्ही
मंगल कार्याआधी
गणाला गावूया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||२||
देव गौरीनंदन आधी वंदुया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०३/२०११
💬 प्रतिसाद
(3)
प
प्रकाश१११
Wed, 03/09/2011 - 15:53
नवीन
पाशानभेदा -खूप छान -
रसीक जमले आम्हांसमोरी
तुझेच रूप जणू शेंदरी
उशीर नका लावू देवा
झडकरी या या
शुभ कार्याची सुरूवात करूया ||१||
वा..वा !!
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 03/09/2011 - 17:54
नवीन
पा भे. गाऊन दाखवा प्लिज. छान लिहिले आहे..
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 03/10/2011 - 05:13
नवीन
मी अन गावून दाखवू? काय चेष्टा करताय काय माझी. मी गाण्याचा आव आणू शकतो फक्त. तूनळीवर मागे दोन तीन लावण्या गायल्या होत्या मी.
आपल्या येथील 'निल्या' नावाचे जे भाऊ आहेत ते चांगले गातात. त्यांनी माझे एक नाट्यगीत अगदी छान गायले होते. तूनळीवरही आहे. त्यांचा आवाज मस्त आहे अन विशेष म्हणजे ते संगीतही स्वत: देतात.
(आजकाल ते दिसत नाही पण :-( )
दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अवांतर: बरीच जुनी मंडळीही दिसत नाही येथे आजकाल. कामाचा व्याप की अजून काही कारणे?
- Log in or register to post comments