व्हेजिटेबल ऑ ग्रातिन ही खूप हॉटेलात मिळणारी डीश आहे. खूपदा ह्यात अननस पण घालतात (नवरतन कोरमा नामक गोड भाजी सारखा). भाज्या बेक करतात आणि त्यावर व्हाईट सॉस आणि चीज घालतात. माझ्या आजे सासू बाईंना 'ह्यात काही लाल तिखट वगैरे' घालत नाहीत का असं प्रश्न पडला होता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता पण मूळ कृतीत लाल तिखट नसते. आणि हो, जसं तुम्हाला माहीतच आहे, मी फारसे 'भरपूर चीज बटर' वाले पदार्थ करू शकत नाही (dietician झाले आहे तेव्हा पासून), म्हणून ह्या डीश चे पण लो कॅल लो चीज व्हर्जन देत आहे.
सामग्री:
२-३ मोठे बटाटे, चिरलेले
एक मूठभर फ्रेश/फ्रोझन कॉर्न
१ चमचा बटर
१ कप फरसबी, चिरलेली
१ कप गाजर, चिरलेले
१ कप शिमला मिरची किंवा रेड/येलो पेपर्स
१/२ कप ब्रेड क्रंब
१ क्यूब चीज (तुम्ही हवंतर जास्त पण घालू शकता)
व्हाईट सॉस साठी:
१ मोठा चमचा मैदा
१ १/२ कप गार दूध
१ चमचा बटर
मीठ आणि मिरपूड, चवीनुसार
कृती:
-प्रथम एका बेकिंग डीश मध्ये बटाटे आणि कॉर्न पसरवून त्यावर थोडं मीठ मिरपूड आणि बटर घालून त्याला २० मिनिट १८० डिग्री ओव्हन मध्ये ग्रील मोड वर ठेवावे.
-आता व्हाईट सॉस करून घावे. त्यासाठी, मैदा गार दुधात नीट मिसळून घ्यायचा. एका भांड्यात थोडं बटर गरम करून त्यात मैदा आणि दुधाचे मिश्रण घालून सारखं ढवळत रहायचे, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. सॉस जरा दाट झालं (थोडे बुड बुडे आल्यावर) कि मग त्यात मीठ मिरपूड घालून बाजूला ठेवायचे. गोडसर सॉस आवडत असेल तर एक चमचा साखर पण त्यात घालू शकता.
- ओव्हन मधून बेक्ड बटाटा काढून त्यावर बाकी भाज्या घालायच्या. मग त्यावर ते व्हाईट सॉस सगळी कडे सारखे ओतायचे. आता, ब्रेड क्रंब चा एक थर करून सगळ्यात शेवटी किसलेले चीज घालायचे.
- ह्या बेकिंग डीश ला ओव्हन मध्ये २० मिनिट १५० डिग्री वर बेक करून मग ह्या व्हेजिटेबल ऑ ग्रातिन ला गरम गरम खायचे.
व्हेजिटेबल ऑ ग्रातिन (बेक्ड व्हेजिटेबल इन व्हाईट सॉस) मला खुप आवडते. पाकृ पण मस्त आहे.
पण ही डिश जर अजुन लो कॅलरी करायची असेल, तर तुम्ही मैद्या एवजी गव्हाचे पीठ वापरुन व्हाईट सॉस बनवु शकता. चव सारखीच लागते. काही फरक कळत नाही, फक्त थोडासा रंग बदलतो सॉसचा.
व्हाईट सॉस करताना कॉर्न फ्लोर वापरले तर पटकन होते.
पॅनमध्ये करताना ते जास्त सोपे जाते.
यात शिवाय, थोडीशी मॅक्रोनी वेगळी शिजवुन घातली तरी छान लागते.
किंवा सोबत लसूण टोस्ट / साधे ब्रेड्चे टोस्ट (त्यावर थोडे बटर+ हर्ब्स) करुन घेतले तरी छान 'ब्रन्च' होतो.
१०० ग्रॅम मैदा = ३६४ कॅलोरी
१०० ग्रॅम गव्हाचे पीठ= ३४० कॅलोरी
ह्या पाक्रु मध्ये, १० ग्रॅम मैदा (३६ कॅलोरी) वापरला आहे. ह्याला जर खरच ह्याहून पण लो कॅल करायचे असेल तर वरून चीझ घालू नका. तुमचा सल्ला हितकारक आहे, पण त्याचा खरंच कॅलोरी कमी करायला खूप उपयोग होणार नाही. प्लीज डोन्ट माइंड!
गव्हात येणारे fibers, micro-nutrients हे मैद्यात नसतात. तेंव्हा मैद्यापेक्षा गव्हाचे पीठ (कणीक) घालणे हितकर आहे. oats घालुनही diet-friendly व्हाईट सॉस करता येते असे ऐकले आहे, पण कधी प्रयत्न नाही केला.
अवांतरः वेगवेगळ्या भाज्यांच्या मराठी नावांना पर्यायी इंग्लिश नावं कुठे मिळू शकतील का? उदाहरणार्थ श्रावण घेवडा, गवार वगैरे भाज्यांना इंग्लिश्मधे काय म्हणतात हे आमच्या 'पेठेतील' तर्खडकरी भाषासंपदेत सापडलेच नाहीये. :) आणि वांग्याला 'तिकडे' एग्फ्रुट व भेंडीला ओक्रा म्हणतात हे कळल्यावर्/ऐकल्यावर झीट येणेच बाकी होते. :) :) :)
सागर - मराठी भाज्यांची काही नावे इथे आहेत. http://anaghaphanse.blogspot.com/2009/03/blog-post_8279.html (दुवा लिंकमध्ये दिला असता दिसत नव्हता म्हणुन असाच देते आहे.
गवारला cluster beans म्हणतात असे गुगलले असता दिसले. आणि श्रावण घेवडयाला green beans/french beans.
तुमची पाकृ पाहून जाईची आठवण झाली. ही भाजी माझी आवडती आहे. त्याबरोबर गार्लिक ब्रेड छान लागतो.
अवांतर: ती जाई कोल्हापुरी कुठे गेलिये कोणास ठावूक? बेक्ड व्हेजी. चा फोटू पाहून आठवण झाली.
खादाडताय मला वाटतं की ही पाककृती तू दुसरया वेळेला देत आहेस. आधी तू हीच पाककृती दिलेली आहेस.
- पिंगू
मला वाटते ही कृति आधी अमिताने नव्हे तर जाईताईंनी दिली होती :
इथे:
http://www.misalpav.com/node/15912
ही अमिताची लो कॅल व्हर्शन आहे असं दिसतंय. कारण मूळ जाईच्या धाग्यावर अशी मागणी झाली होती (निदान मजकडून..!! :) )
मस्त पाकृ..
ह्म्म्म....मला मैदा वगैरे घातलेला आवडत नाही...पण नुस्त्या भाज्या ऑलिव्ह ऑईल आणि मिरपुड + मीठ टाकुन चांगलं लागेलं.
मी साधारणपणे फ्लॉवर आणि मश्रुम वापरुन ऑ ग्रातिन करते...
व्हेजिटेबल ऑ ग्रातिन (बेक्ड व्हेजिटेबल इन व्हाईट सॉस) मला खुप आवडते. पाकृ पण मस्त आहे.
पण ही डिश जर अजुन लो कॅलरी करायची असेल, तर तुम्ही मैद्या एवजी गव्हाचे पीठ वापरुन व्हाईट सॉस बनवु शकता. चव सारखीच लागते. काही फरक कळत नाही, फक्त थोडासा रंग बदलतो सॉसचा.
व्हाईट सॉस करताना कॉर्न फ्लोर वापरले तर पटकन होते.
पॅनमध्ये करताना ते जास्त सोपे जाते.
यात शिवाय, थोडीशी मॅक्रोनी वेगळी शिजवुन घातली तरी छान लागते.
किंवा सोबत लसूण टोस्ट / साधे ब्रेड्चे टोस्ट (त्यावर थोडे बटर+ हर्ब्स) करुन घेतले तरी छान 'ब्रन्च' होतो.
मृणालिनी ताई,
१०० ग्रॅम मैदा = ३६४ कॅलोरी
१०० ग्रॅम गव्हाचे पीठ= ३४० कॅलोरी
ह्या पाक्रु मध्ये, १० ग्रॅम मैदा (३६ कॅलोरी) वापरला आहे. ह्याला जर खरच ह्याहून पण लो कॅल करायचे असेल तर वरून चीझ घालू नका. तुमचा सल्ला हितकारक आहे, पण त्याचा खरंच कॅलोरी कमी करायला खूप उपयोग होणार नाही. प्लीज डोन्ट माइंड!
:)
डायेटिशियन,
अमिता
ओह, हे मला माहित नव्हते. मला वाटायचे की मैद्या पेक्षा गव्हा मधे कमी कॅलरीज असतात.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. :)
मला वाटते मैद्यामध्ये गव्हापेक्षा जास्त कॅलरीज असतात असे नसून त्या एम्प्टी कॅलरीज असतात म्हणून त्याला वाईट म्हटले जाते..
(डाएटिशियनचा क्लायंट) गवि
गव्हात येणारे fibers, micro-nutrients हे मैद्यात नसतात. तेंव्हा मैद्यापेक्षा गव्हाचे पीठ (कणीक) घालणे हितकर आहे. oats घालुनही diet-friendly व्हाईट सॉस करता येते असे ऐकले आहे, पण कधी प्रयत्न नाही केला.
डिश आवडलीच, पण लो कॅल कशी झाली ते नाही कळले!
(पार्ट टाईम डायेटिशियन ;)) - मनिष
रात्रीच्या जेवणाऐवजी ट्राय करायला हरकत नाही ...
अवांतरः वेगवेगळ्या भाज्यांच्या मराठी नावांना पर्यायी इंग्लिश नावं कुठे मिळू शकतील का? उदाहरणार्थ श्रावण घेवडा, गवार वगैरे भाज्यांना इंग्लिश्मधे काय म्हणतात हे आमच्या 'पेठेतील' तर्खडकरी भाषासंपदेत सापडलेच नाहीये. :) आणि वांग्याला 'तिकडे' एग्फ्रुट व भेंडीला ओक्रा म्हणतात हे कळल्यावर्/ऐकल्यावर झीट येणेच बाकी होते. :) :) :)
अमिता - पाकृ, फोटो आवडले - लो कॅलरीची असल्याने ट्राय नक्की करुन बघेन.
सागर - मराठी भाज्यांची काही नावे इथे आहेत. http://anaghaphanse.blogspot.com/2009/03/blog-post_8279.html (दुवा लिंकमध्ये दिला असता दिसत नव्हता म्हणुन असाच देते आहे.
गवारला cluster beans म्हणतात असे गुगलले असता दिसले. आणि श्रावण घेवडयाला green beans/french beans.
होतेल दर्शन प्रभात रोड पुणे मधे हा पदार्थ मिळतो..खुप सुंदर बनवतात.
बरोबर गार्लिक टोस्ट..
आवडता पदार्थ..
बघूनच तोंडाला पाणी सुटले
एकदम झकास पाकृ आहे :))
तुमची पाकृ पाहून जाईची आठवण झाली. ही भाजी माझी आवडती आहे. त्याबरोबर गार्लिक ब्रेड छान लागतो.
अवांतर: ती जाई कोल्हापुरी कुठे गेलिये कोणास ठावूक? बेक्ड व्हेजी. चा फोटू पाहून आठवण झाली.