Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नेहमीसारखेच - ३

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Wed, 03/09/2011 - 07:34
नेहमीसारखेच - १ नेहमीसारखेच - २ नेहमीसारखेच - ३ आजही मावळतीला ढग काळवंडले... अगदी नेहमीसारखेच... आजही तुझ्या स्मरणाने डोळे पाणावले... अगदी नेहमीसारखेच... कसे सांगावे तुला गं... रोज पहाटेसह निघतो मी... मला अर्ध्या वाटेवर सोडून... पहाट, सकाळ, मध्यांन्न सगळे जातात परतुनी... पण तरी मी चालत राहतो... तुझ्या शोधात वणवण फिरतो... कुठ जाऊन दडतेस गं... अखेर मी तसाच...शरीर थकवून...घरी परततो... बिछान्यावर अंग टाकून...शुद्ध हरपतो... अन् मग...तू स्वप्नात येऊन विचारतेस.... कुठे असा भटकत होतास वेड्यासारखा...कधीची वाट पाहतेय... तेही नेहमीसारखेच....अगदी नेहमीसारखेच.... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०९\०३\२०११)

Book traversal links for नेहमीसारखेच - ३

  • ‹ नेहमीसारखेच - २
  • Up
  • नेहमीसारखेच - ४ ›

प्रतिक्रिया द्या
2206 वाचन

💬 प्रतिसाद (5)
फ
फ्रॅक्चर बंड्या Wed, 03/09/2011 - 07:43 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 03/09/2011 - 08:23 नवीन
अन् मग...तू स्वप्नात येऊन विचारतेस.... कुठे असा भटकत होतास वेड्यासारखा...कधीची वाट पाहतेय... तेही नेहमीसारखेच....अगदी नेहमीसारखेच.... मस्त एकदम .. कवितेला एकदम वेगळेच वळण लावणार्‍या ओळी
  • Log in or register to post comments
अ
अथांग Wed, 03/09/2011 - 23:31 नवीन
आज खूप दिवसांनी मिसळपावला भेट दिली, आणि बरेच वाचन केले...पाहुणी बनुन. पण तुमची ही व आधीच्या दोन्ही कविता वाचल्या आणि अभिप्राय दिल्यावाचून रहावेना, म्हणून मग शिस्तीत साईन-इन करुन हे लिहीतेय. फारच छान आहे ओघवती भावना आणि कवितेची भाषासुद्धा ! मुक्तछंदाचा आभास - पण तरीही एका वेगळ्या बंधात गुंतवून ठेवणारी ही कविता. लिहीत रहा, वाचायला आवडेल... -अथांग.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 03/11/2011 - 08:55 नवीन
धन्यु अथांग तै!! वाचत रहा... पुढील भाग देत राहीन....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 03/11/2011 - 08:15 नवीन
धन्यु..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा