आलो असा मी नजरेत
आलो मी असा नजरात कुणाच्या न मी आलो
तुझ्या प्रकाशात आज मी असा लपुन राहिलो
रक्ताळलो, खरचटले किती, किती मी पडलो
वस्त्रच तुझ्या वाटेस, असा त्यास चिटकलो
तो म्हणाला मंदिरात जा तु , देव तेथेच भेटतो
राहिलो उभा समोर मी, तरी न त्यास दिसलो
प्रतिक्षेच्या लाटांवरी सवार, असा मी वाहिलो
बुडालो-उभारलो असा, किनारी न मी लागलो!
💬 प्रतिसाद
(2)
प
प्रकाश१११
Fri, 03/11/2011 - 02:37
नवीन
निनाव -छान सूर .मस्त
प्रतिक्षेच्या लाटांवरी सवार, असा मी वाहिलो
बुडालो-उभारलो असा, किनारी न मी लागलो!
आवडली कविता
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 03/11/2011 - 08:24
नवीन
आवडली... सुंदर..
- Log in or register to post comments