Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हत्तीदादा हत्तीदादा -

व — विदेश, Sat, 03/12/2011 - 10:01
हत्तीदादा हत्तीदादा कसला आहार घेतो रे ? अगडबंब शरीर बघून शत्रू गार होतो रे ! ससेभाऊ ससेभाऊ कुठला साबण वापरतो ? शुभ्र रेशमी अंगाला डाग एकही ना पडतो ! अस्वलकाका अस्वलकाका कोणते तेल लावतो रे केस नेहमी दाट काळे गुपित काय सांग बरे ? हरणा हरणा - थोडं थांब कसले बूट घालतो सांग ? उड्या मारत चपळाईने लांब लांब टाकतो ढांग ! माकड माकड - हूप हूप कुठली फळे खातो खूप ? फांदीवरच्या कसरतीने आम्हाला तू करतो चूप ! सिंहराज सिंहराज - कोणत्या चघळता गोळ्या ? त त प प करतो आम्ही ऐकून तुमच्या डरकाळ्या !

प्रतिक्रिया द्या
1838 वाचन

💬 प्रतिसाद (5)
न
निनाव Sat, 03/12/2011 - 10:14 नवीन
वाह. कित्ती सुंदर. खूपच छान..अगदी गोड लिहिले आहे. हरणा हरणा - थोडं थांब कसले बूट घालतो सांग ? उड्या मारत चपळाईने लांब लांब टाकतो ढांग ! लहान मुलांसाठी लिहिणे सर्वात कठिण आहे. आणि तुम्ही ते अगदी सहज केले आहे. - पुलेशु.
  • Log in or register to post comments
न
निनाव Sat, 03/12/2011 - 10:14 नवीन
वाह. कित्ती सुंदर. खूपच छान..अगदी गोड लिहिले आहे. हरणा हरणा - थोडं थांब कसले बूट घालतो सांग ? उड्या मारत चपळाईने लांब लांब टाकतो ढांग ! लहान मुलांसाठी लिहिणे सर्वात कठिण आहे. आणि तुम्ही ते अगदी सहज केले आहे. - पुलेशु.
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sat, 03/12/2011 - 16:12 नवीन
खुप छान निरागस...
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Mon, 03/14/2011 - 04:30 नवीन
आवडले !
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 03/14/2011 - 06:11 नवीन
विदेश हे आजपासुन बालकवी आहेत मिपा चे ... जियो !! -(मिपा चे मालकवी) पु. सी. फडके
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा