Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नव्या यमांची नवीन भाषा

ग — गंगाधर मुटे, Sun, 03/13/2011 - 04:08
नव्या यमांची नवीन भाषा मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी यमास थोडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा गंगाधर मुटे .........................................................................

प्रतिक्रिया द्या
1285 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
प्रकाश१११ Sun, 03/13/2011 - 04:25 नवीन
गंगाधर मुटेजी-खूपच छान आशय असलेली कविता नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा छान मस्त ....!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/13/2011 - 04:57 नवीन
सुंदर कविता. '' अता मुखातून शोषितांच्या... '' ओळ तर एखदम खास वाटली. अजून येऊ द्या.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
S
sneharani Sun, 03/13/2011 - 05:11 नवीन
मस्त कविता!
  • Log in or register to post comments
न
निनाव Sun, 03/13/2011 - 05:53 नवीन
वाह. एकदम सुंदर मुटे जी. गहन रचना.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा