Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डु-आयडी थेरपी

अ — अरुण मनोहर, Sun, 03/13/2011 - 09:26
नियतीने कोरले जे असे चेहऱ्यावरती तसे ते ठसे नित्य मुखवटे तेच खुपावे बंध किती हे सहन करावे? नाव जसे मिळविले कर्माने निष्कलंक नी अबाध्य जपणे जपती सगळे प्राणपणाने झुकतो आत्मा ह्या ताणाने मुक्त श्वास घेण्या तापातून उपाय असती फ़ार पुरातन नाट्य, तमाशा, किंवा लेखन प्रदान करीती अलगच दर्शन कोणी जाती हास्यगृहांतरी टिंगू अथवा लंबू दिसे जरी हसूनी स्वत:ला खरे पोटभरी मुखवट्याची बोच नष्ट करी जाल जादुई बघा उभरले चेहरा पुस्तक तेथ उमटले ब्लॉग विविध आयडींने केले समाज दर्पण जणू उभरले महाजाल बघ विणले घट्ट का करिशी स्वत्वाचा हट्ट? धरी आयडी नाना कळा घेई श्वास बेबंद मोकळा संस्थळींचे जादुई दर्पण तणाव-नाशक मुक्त वर्तन दिसुही शके ना स्वत: जसे रूप दर्पणी भिन्न दिसावे

प्रतिक्रिया द्या
2415 वाचन

💬 प्रतिसाद (15)
न
निनाव Sun, 03/13/2011 - 09:34 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 03/13/2011 - 13:21 नवीन
मस्त....................खुप आवडले!!!!
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sun, 03/13/2011 - 13:28 नवीन
झकास आणि सकस /सरस
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 03/13/2011 - 13:34 नवीन
तुमचे डु. आयडी. किती? ;)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 03/13/2011 - 14:43 नवीन
खर्‍या आयडी बी विविध अंतर्प्रतिमेने वादित्/संवादित असतात आपलाच वाद आपणाशी
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 03/13/2011 - 17:05 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रीत-मोहर Sun, 03/13/2011 - 15:43 नवीन
मस्त ......आवडली कविता
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 03/13/2011 - 15:49 नवीन
तुमचा दुसरा आयडी नक्की पाषाणभेद किंवा प्रकाश१११ किंवा गंगाधर मुटे आहे .. बरोबर की नाही ? ;)
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 03/13/2011 - 15:56 नवीन
आय एम ऑनर्ड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अरुण मनोहर Sun, 03/13/2011 - 15:57 नवीन
प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 03/13/2011 - 22:05 नवीन
वावा!! आवडले. :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Mon, 03/14/2011 - 03:18 नवीन
अरुण मनोहर - छान .आवडली कविता नाव जसे मिळविले कर्माने निष्कलंक नी अबाध्य जपणे जपती सगळे प्राणपणाने झुकतो आत्मा ह्या ताणाने खूप शुभेच्छा ..!!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 03/14/2011 - 03:29 नवीन
छान कविता! डु-आयडी थेरपी घेऊन बघावी असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 03/14/2011 - 03:35 नवीन
अच्छा ! ही पुर्ण कविता आहे तर. सुन्दरच!!
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Mon, 03/14/2011 - 07:36 नवीन
डु-आयडी मंजे काय ? डु-आयडी कसा काढतात ? आपली तर बुवा जेवढे काय आयडी आहेत ति सर्व अस्सल/वरिजनल आहेत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा