Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दु:ख

प — पद्मश्री चित्रे, Sun, 03/13/2011 - 19:29
दु:ख माझे देखणे , द्रिष्ट त्या लावू नका एकटा आहे सुखी मी, सोबती होवू नका.. चांदण्यांचा हा पसारा ,चन्द्र तरीही एकटा शल्य घेवूनी फिरे तो, तेजावरी जावू नका.. पापण्यांच्या आड पाणी, सागराला लाजवी हासरा चेहरा बघूनी, गोडवे गावू नका... साद मिटते अन्तरी, शब्द सारे पोरके वेदनेची आग उरली, ती तरी मागू नका.. घाव आहे जीवघेणा , तरी ही जिव्हारी राखतो बेगडी या सान्त्वनाची ,आस मज दावू नका... वाळवंटासारखा -निष्पर्ण मी, निष्प्राण मी मॄगजळाची ओढ माझ्या , अंतरी उजळू नका...

प्रतिक्रिया द्या
4830 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
प्राजु Sun, 03/13/2011 - 21:44 नवीन
सुंदर!! पापण्यांच्या आड पाणी, सागराला लाजवी हासरा चेहरा बघूनी, गोडवे गावू नका... आवडले..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम Mon, 03/14/2011 - 05:10 नवीन
खुपच सुंदर फुलवा.."दु:ख माझे देखणे , द्रिष्ट त्या लावू नका " दु:ख अस पण व्यक्त करता येतं ना !!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 03/14/2011 - 06:16 नवीन
छाण गं मस्त गं ... :) - अद्भुत गुत्ते अग फुलवा तु फुलवायचं || की नुस्तंच झुलवायचं || शिंगरु मेलं हेलपाट्यानं ||असं नाही चालायचं || तुका म्हणे ||धृ||
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 03/14/2011 - 07:21 नवीन
वाळवंटासारखा -निष्पर्ण मी, निष्प्राण मी मॄगजळाची ओढ माझ्या , अंतरी उजळू नका वाह... एकेक कडवे सुंदरच.... मांडणी निट केलीत तर अजुनही परीणामकारक होईल.
  • Log in or register to post comments
क
काव्यवेडी Mon, 03/14/2011 - 18:29 नवीन
सुन्दर कविता !! दु:ख माझे देखणे ...............खूप छान कल्पना !!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/15/2011 - 13:19 नवीन
सुंदर कविता .. प्रत्येक शेर जबरदस्त दु:ख माझे देखणे , द्रिष्ट त्या लावू नका एकटा आहे सुखी मी, सोबती होवू नका.. चांदण्यांचा हा पसारा ,चंद्र तरीही एकटा शल्य घेवूनी फिरे तो, तेजावरी जावू नका.. एकदम छानच
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 06/24/2011 - 15:52 नवीन
वाळवंटासारखा -निष्पर्ण मी, निष्प्राण मी मॄगजळाची ओढ माझ्या , अंतरी उजळू नका... क्लास! फार दिवसांनी वाचले! राघव
  • Log in or register to post comments
प
पल्लवी Sun, 06/26/2011 - 18:04 नवीन
छान कविता जमलिये.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 06/27/2011 - 00:21 नवीन
मस्त, सुंदर, सुरेख कविता!!!! माझ्याकडून स्टँडिंग ओवेशन!!!! जियो!!!
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Tue, 07/05/2011 - 12:25 नवीन
मनापासून धन्यवाद. पिवळा डांबिस - तुमचा अभिप्राय पाहून छान वाटलं...
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 11/22/2019 - 10:29 नवीन
परत वाचलं. तेवढीच टोकदार भावना जाणवते. सलाम.
  • Log in or register to post comments
म
मायमराठी Fri, 11/22/2019 - 18:57 नवीन
शल्य घेऊनी फिरे तो, तेजावर जाऊ नका वेदनेची आग उरली ती तरी मागू नका फक्त अशा एकेक ओळी घेऊन लिहायचे ठरवले तरी कित्येक तरुण हिरव्या पानांचा वृद्ध पाचोळा होईपर्यंत लिहिता येईल. वरवर जरी वैयक्तिक भावना वाटली तरी ह्यांत प्रत्येक मानव डुंबलेलाही दिसतोय. किंबहुना हे दुःख फार वैश्विक वाटतंय मला. काहीतरी मिरवावं ह्या धाटणीचे धीट शब्द नेमकेपणे काळजात उतरतात. लिहिणारी व्यक्ती व वाचक यांच्या मनामनांतील अंतर मिटवून टाकून दोघे एकाच कट्ट्यावर बाजूबाजूला बसवून टाकलं या रचनेने. इतकं की आपणच कोणी गुप्तहेर कवी नेमून त्याला स्वतःवरच पाळत ठेवायला सांगितली. त्याने आपलं यथोचित केलेलं वर्णनाचं आपल्याला नवल वाटावं. आणि मग त्या दुःखाचं कौतुक जाणवू लागून ते कोणालाही सांगायचंच नाही, या जाणीवेने ते आपल्याच मुखावाटे नकळत बाहेर पडावं. एकंदरीत हवंहवंसं वाटावं असं हे वेदनेचे शब्दचित्र खूपच भावलं. एव्हाना कविता आवडली हे वेगळ्याने सांगायला हवंच का? त्या आवडलेपणाच्या भरात वर काहीबाही बरळलो; त्याबद्दल माफ करा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा