Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयूष्य एक रंगभूमी....

ह — हर्षद प्रभुदेसाई, Mon, 03/14/2011 - 07:06
आयूष्याच्या ह्या रंगभूमीवरचे, आपण जणू एक कलाकारच असतो । आपापल्या परीने प्रत्येक जण, आपापली भूमिका ति बजावत असतो । प्रत्येक दीवस तो नवा प्रयोग ह्या, रंगमंच्यावर मांडत असतो । असंख्य अंकांतले विविध प्रवेश हे, आपण येथे साकारत असतो । कुणास जमतो-कुणास न जमतो, अभिनय येथे परी करावाच लागतो । दुःखात हसून डोळे हळूच पुसून, नाट्यमय देखावा उभाऱ्हावाच लागतो । कितीही लांबला जरी खेळहा तरी तो, शेवट त्याचा अपूल्या हातीच नसतो । खेळावेच लागते म्हणूनी खेळत राहणे, ह्या परी कोणता मग मार्गच नसतो । ह्या खेळाचा सुत्रधार तो, एकमेव हा देवच असतो । आपण फक्त जणू ताबेदार ते, हुकमावर त्याच्या नाचत असतो । तोच ठरवितो आपूली भूमिका, अन क्रमा-क्रमाने बदलत नेतो । शेवटी देउनी वृद्धपणा तो, आपूली रजाही मानूनी घेतो । हर्षद अ. प्रभुदेसाई......

प्रतिक्रिया द्या
1296 वाचन

💬 प्रतिसाद (3)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 03/14/2011 - 07:18 नवीन
मस्तच जमलीय....
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 03/14/2011 - 07:34 नवीन
पण माझ्या माहिती प्रमाणे ... "आयुष्य एक चुलिवरच्या कढई मधले .. क्कांऽऽऽऽऽद्दे प्पोऽऽऽऽऽऽऽऽहे" आहेत म्हणुन !!
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Mon, 03/14/2011 - 07:40 नवीन
नाय, आयुश्य म्हनजे गुलाबजामुन ! कादा पोहे खान्याचि गरज न वाटलेला णकु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा