Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नेहमीसारखेच - ५

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Mon, 03/14/2011 - 07:16
नेहमीसारखेच - १ नेहमीसारखेच - २ नेहमीसारखेच - ३ नेहमीसारखेच - ४ नेहमीसारखेच - ५ आजही पावसाने सरींचे सूर छेडले... अगदी नेहमीसारखेच.... आजही तुझ्या कुंतलांचा मृदगंध दरवळला.... अगदी नेहमीसारखेच.... नजरेसमोर अशी विजेची रेष उमटली गं..... इतकी मोहक तनु जणू हिरकणी.... इतक्या ढगाळलेल्या भुईवर जणू चमकती चांदणी... भान हरपून मी जागच्या जागी थिजलो.... श्वास हृदयात अडकून बापडा स्तब्ध जाहलो.... कसे स्व:ताला सावरू गं..... मग माझ्या काळजात गान उमटू लागले.... मेघमल्हारचे आळवणीचे सूर घुमू लागले.... आता पुन्हा ती लोचनांतून भरभरून ओघळू लागली.... गालांवरून सरकून ओठात अडकाया लागली.... आणि माझी मात्र... उगाच दमछाक.... तिला गाठायला.... नेहमीसारखेच... ............ अन् ती तर जणू काही घडलेच नाही..... असे पाहत.... चक्क निघून गेली... नेहमीसारखेच.... अगदी नेहमीसारखेच... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१४/०३/२०११)

Book traversal links for नेहमीसारखेच - ५

  • ‹ नेहमीसारखेच - ४
  • Up
  • नेहमीसारखेच - ६ ›

प्रतिक्रिया द्या
1445 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
प्रकाश१११ Mon, 03/14/2011 - 08:46 नवीन
मिसळलेला काव्यप्रेमी आजही पावसाने सरींचे सूर छेडले... अगदी नेहमीसारखेच.... आजही तुझ्या कुंतलांचा मृदगंध दरवळला.... नेहमीसारखीच छान . मस्त !!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/15/2011 - 13:24 नवीन
कुंतलांचा मृदगंध .. आवडला हा शब्द.. कविता नेहमीसारखीच सुंदर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा