Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयुष्याची दोरी

ग — गंगाधर मुटे, Tue, 03/15/2011 - 13:41
आयुष्याची दोरी हे सजीवसंख्येचे नियमन करणार्‍या मृत्यो, कधीही, कुठेही आणि कसेही आयुष्याची दोरी कापून टाकण्याचे तुझे अधिकार मान्य आहेत मला पण सन्मानाने मरण्याचे अधिकार मलाही असावेत की नाही? हे “जीवन” तुझे असले तरी “मी” तर “माझा” आहे ना? तुझ्यामुळे आयुष्य सरणार असले तरी मी मात्र उरणारच आहे. आणि म्हणून... माझी तुझ्याबद्दल तक्रार नसली तरी एक छोटीशी नाराजी आहे आयुष्य छाटण्याबद्दल हरकत नाही, पण... पण असा देहाला का छाटतोस रे? तुकड्यांतुकड्यांमध्ये का वाटतोस रे? कधी चिंध्या, कधी लगदा, कधी खाद्य मासोळ्यांचे आणि कधीकधी तर आरपार उमटतात छेद गोळ्यांचे थांबायला नकोत काय हे प्रताप तुझ्या सापळ्यांचे?? हे ऐकून मृत्यू थोडा भांबावला मग हळूच हसून म्हणाला “ही तुझी तक्रार की कांगावा? प्रथम विचार कर की सल्ला कुणी कोणास सांगावा? अरे! कृती तुम्ही करता आणि विकृती माझी म्हणता? “एक्सलेटर” दाबण्याआधी “ब्रेक” मारणे शिका वेगासोबतची थांबवा फालतू अहमिका ज्याचे हक्क त्याला द्यावे, लूट थांबायला हवी नाहीतर अटळ आहे संघर्ष व यादवी स्वावलंबी झाडावर बहरल्यात परावलंबी वेली परावलंबीने स्वावलंबीची काय गत केली? सभ्यतेची उत्क्रांती दिशाहीन गेली म्हणूनच मी आता शस्त्रंपालट केली अरे माणूस म्हणून जन्मलात तर माणसावाणी वागा जरा तरी फुलवून पाहा सौजन्याच्या बागा......!! ” गंगाधर मुटे ...........................................

प्रतिक्रिया द्या
1274 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
प्रकाश१११ Tue, 03/15/2011 - 16:12 नवीन
गंगाधर मुटेजी आयुष्य छाटण्याबद्दल हरकत नाही, पण... पण असा देहाला का छाटतोस रे? तुकड्यांतुकड्यांमध्ये का वाटतोस रे? कधी चिंध्या, कधी लगदा, कधी खाद्य मासोळ्यांचे छान .आवडले
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/15/2011 - 16:23 नवीन
कविता खुपच आवडली .. पहिल्या काही ओळी वाचुन असे वाटले होते "मी मरण .. एक भीती" अशी कविता मरण बोलते आहे या आशयाने द्यावी का ? तितक्यात तुम्हीच पुढे लिहिले तसे .. म्हणुन जास्त आवडली कविता ... कवितेमागचे विचार खरेच विचार करण्यास लावणारे आहे ..
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 03/16/2011 - 07:30 नवीन
कवितेमागचे विचार खरेच विचार करण्यास लावणारे आहे +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
स
स्वानन्द Tue, 03/15/2011 - 18:28 नवीन
गंगाधर साहेब, मस्तच!!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम Wed, 03/16/2011 - 07:50 नवीन
अप्रतिम कविता,,, सत्य आहे हे.. आणी अचूक लिहिलत तुम्ही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा