मिपा चा सर्वर फुकुशिमा जवळ असावा...झालेल्या अणुभट्टी स्फोटामुळे कदाचित सर्वर मध्ये तांत्रिक बिघाड होऊन तो निकामी झाला असावा.....परंतु तंत्रज्ञांच्या चमूने अथक प्रयत्नांनी तो पुन्हा कार्यान्वित केला....(हुश्श) ;)
आहो काहीतरीच काय ? काल बंद पडलेल्या मिपावर प्रकाश १११ आणि पाशाणभेद ने ३-३ कविता , काळ्यांनी पाक-अमेरिकेचे अपडेट्स आणि उगा काहितरीच ने २ संपादकीय टाकले होते .
खोटारडे कुठले ;)
- टारझन-साँई
राम राम मिपाकर तंत्रज्ञ मंडळी. अजून दोनेक तास घ्या. पण मिपा लवकर उघडले पाहिजे आणि पुन्हा विश्रांती अवस्थेत जायला लागू नये असे काही तरी करा राव....! एवढाच प्रतिसाद प्रकाशित करायला दहा मिनिटे लागली. लैच स्लो झालंय मिपा.......! :(
मिपा कधी व्यवस्थित सुरु होईल हे मला माहिती नसतं. काही मिपाकर मित्र मंडळी मला त्याबद्दल विचारुन बेजार करतात हो...! :)
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया