Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आठवणी ... !!

प — प्रकाश१११, Wed, 03/16/2011 - 03:14
आठवणी असतात मनात दडलेल्या येतात अचानक नकळत मनाच्या काठावर अलगद पावलांनी नि येतात समोर अनाहुतपणे..... आठवणी कधीकधी भासाच्या कधीकधी त्रासाच्या मनात रुजलेल्या पिंपळाच्या झाडासारख्या खोल पसरलेल्या घट्ट खोल मुळांच्या काही आठवणी नाजूक प्रेमाच्या अलगद मोरपिसी आठवणीच्या अल्लड पाउस नि तिच्या सोबत चिंब चिंब भीजल्याच्या गरमागरम चहाच्या आठवणी नाही होत कधी शिळ्या नाही उडत त्याचा रंग त्या असतात रंगीत आंबट चिंबट मस्त चवीच्या …! आपले जुने मातिचे घर आठवणीतून अलगद येते वर ती श्रावणातील सकाळ परीक्षेचा पेपर.... तो कोंबडा छाप ब्लोटिंग पेपर नव्या पुस्तकांचा करकरीत वास आपल्या अंतरंगात झीरपतात मृदुगंधासारख्या ...!! शाळेला मारलेल्या दांड्या पोट दुखीचे अस्सल कारण मग अंगावर पांघरून घेऊन शुभ्र ढग न्याहाळत पक्षांच्या रेषा छेदून ढगाला स्वप्नात हरवल्याचे क्षण कोठे हरवून गेले कधीचे ….. शोधात बसतो कधीपण डोळ्यातला एक थेंब फक्त साक्षीला ....!!

प्रतिक्रिया द्या
1699 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 03/16/2011 - 07:25 नवीन
सुंदर आठवणी....
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम Wed, 03/16/2011 - 07:42 नवीन
खूप छान आपले जुने मातिचे घर आठवणीतून अलगद येते वर ती श्रावणातील सकाळ परीक्षेचा पेपर.... तो कोंबडा छाप ब्लोटिंग पेपर नव्या पुस्तकांचा करकरीत वास आपल्या अंतरंगात झीरपतात मृदुगंधासारख्या ...!! विशेश आवडले..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 03/16/2011 - 13:10 नवीन
आठवणी अश्याच असतात चिरतारुण्याचे वरदान लाभलेल्या .. तुम्ही सुंदर लिहिले आहे .. अप्रतिम नेहमी प्रमाणे
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 03/18/2011 - 03:02 नवीन
आवडली कविता.. खूप मनापासून आतून आली आहे हे प्रत्येक शब्दातून कळते आहे.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 03/18/2011 - 08:07 नवीन
मस्त प्रकाश जि :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा