प्रलय
प्रलय
निनादतो शंख कुणाचा
डमडमतो डमरू संगे
महारुद्राने का उघडला
तिसरा नेत्र नि:संगे
विखार तो डंख शेषाचा
कडकडतो दामिनी संगे
सागराने का बुडवला
भयभीत मित्र अंतरंगे
पसरतो पंख तमाचा
घणघणतो मृदुंग संगे
कालाग्नी का चेतवला
भाजूनी आकाशछत्र दुभंगे
ढळतो पंथ पृथ्वीचा
धडधडतो उल्काप्रपात संगे
हलाहल तो पचवलेला
कंठही लालीत आज रंगे
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१७/०३/२०११)
💬 प्रतिसाद
(14)
अ
अवलिया
गुरुवार, 03/17/2011 - 07:54
नवीन
मस्त !
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 03/17/2011 - 08:04
नवीन
वा! मस्त आणि समयोचित!
- Log in or register to post comments
प
प्रकाश१११
गुरुवार, 03/17/2011 - 08:41
नवीन
मिसळलेला काव्यप्रेमी -मस्त जमलीय
विखार तो डंख शेषाचा
कडकडतो दामिनी संगे
सागराने का बुडवला
भयभीत मित्र अंतरंगे
- Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_
गुरुवार, 03/17/2011 - 08:48
नवीन
छान...
आवडली कविता....
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 03/17/2011 - 08:48
नवीन
रौद्ररस जबरदस्त ... एकदम शब्दाशब्दात अंगार भरलाय
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 03/17/2011 - 11:47
नवीन
आवडली.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 03/17/2011 - 19:03
नवीन
वाह!रौद्ररस जबरदस्त!!
- Log in or register to post comments
न
निनाव
गुरुवार, 03/17/2011 - 22:55
नवीन
उंच कविता आहे. जब्बरदस्तच.
विखार तो डंख शेषाचा
कडकडतो दामिनी संगे
सागराने का बुडवला
भयभीत मित्र अंतरंगे
भन्नाट सुचले आहे.
- Log in or register to post comments
च
चित्रा
Fri, 03/18/2011 - 12:55
नवीन
कल्पना आवडली.
हे कोणते वृत्त आहे?
- Log in or register to post comments
अ
अनिदेश
Tue, 10/08/2013 - 06:43
नवीन
ही वाचायची राहिली होती.....:).....प्रेमा कडून प्रलयाकडे कस वळलास रे बाबा :)
- Log in or register to post comments
स
सार्थबोध
Tue, 10/08/2013 - 06:48
नवीन
खूप छान कविता
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 02/26/2019 - 11:48
नवीन
आज या कवितेची फार आठवण झाली.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 02/26/2019 - 12:23
नवीन
चपखल.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 02/26/2019 - 12:32
नवीन
पण आज इतके काही विशेष झाले नाही. (म्हणजे प्रलय वगेरे म्हणण्या एवढे)
झुरळे झाली की बेगॉन मारावेच लागते आणि ते संपले तर पॅरागॉन असतेच ना जवळ?
पैजारबुवा,
- Log in or register to post comments