Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रोज कौतुकात दंग बायको जरी ,

व — विदेश, Sat, 03/19/2011 - 06:11
( चाल: आज गोकुळात रंग खेळतो हरी - ) रोज कौतुकात दंग बायको जरी , लाटणे जरा जपून आज बघ करी |धृ | तोच मित्र रोज सिगारेट ओढतो थेट खिशातून तुझ्या नोट काढतो , गुंतवुनी बोलण्यात चहा उकळतो - सावध केले मी तुला कितीदा तरी |१| सांग मित्रमंडळास काय जाहले ? कुणी गंडविल्याविना कुणा न सोडले ! ज्यास त्यास लुटण्याचे चंग बांधले - एकटाच वाचशील काय तू तरी |२| तू कधीच रंगढंग नाही उधळला ! मित्रमंडळात तरी कसा गुंगला ? तो पहा - चंडिकेस पत्ता लागला ... हाय, धावली धरून लाटणे करी |३|

प्रतिक्रिया द्या
1534 वाचन

💬 प्रतिसाद (5)
न
नगरीनिरंजन Sat, 03/19/2011 - 06:27 नवीन
हा हा! छान जमलंय आणि चालीवर म्हणताही येतंय. अवांतरः मूळ गाण्याची चाल मी नेहमी चुकवतो आणि मग "राधिके जरा जपून जा तुझ्या घरी" नंतर "रघुपति राघव राजाराम" म्हणावंसं वाटतं.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Sat, 03/19/2011 - 06:31 नवीन
भन्नाट जमलीय.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 03/19/2011 - 06:34 नवीन
जमलं नमलं चाल पण जमलीय मस्त झालंय.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sat, 03/19/2011 - 12:05 नवीन
मस्त जम्लिये
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 03/19/2011 - 12:37 नवीन
हा हा हा मस्त अमोल केळकर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा