Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?....

ह — हर्षद प्रभुदेसाई, Sat, 03/19/2011 - 17:06
तुझ्या मते सांग माला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ? मनाने मनावर केलेल प्रेम.... की नजरेच सौंदर्यावर असलेल प्रेम हे प्रेम असतं ? खर पाहता प्रत्येक जण प्रेमात, ह्या दोन्ही गोष्टींना महत्व देत असतो । प्रत्येकाच्या दृष्टीने फक्त... दिलेल्या'इम्पॉर्टन्स'च्या'पर्सेंटेज'मध्ये थोडासा फरक असतो । तुझ्या मते सांग माला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ? आईने-मुलावर,नवऱ्याने-बायकोवर,मित्राने-मैत्रिणीवर केलेल प्रेम.... की माणसाने माणसावर केलेल प्रेम हे प्रेम असतं ? खर पाहता प्रेमात नात्याला फारस महत्व नसतं । कारण प्रेमाच्या ओलाव्याने नात फुलत असतं... पण नात असल्याने त्यात प्रेमाचा ओलावा असतोच अस काही नसतं । तुझ्या मते सांग माला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ? एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्याने, अथवा तिची जागा दुसऱ्या कुणीतरी घेतल्याने.. तिच्यावर असलेल प्रेम का कमी होत असतं ? माझ्यामते तरी तीच्या असण्याने वा नसण्याने, असलेल प्रेम कमी-जास्त होत नसतं । प्रेम असेल जरका तिच्यावर मनापासून तर... तीच्या नसण्यातही असण्याचा आभास ते निर्माण करत असतं । तुझ्या मते सांग माला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?.... हर्षद अ. प्रभुदेसाई.....

प्रतिक्रिया द्या
3382 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
प्रकाश१११ Sun, 03/20/2011 - 00:09 नवीन
छान लिहिले आहेस - खर पाहता प्रेमात नात्याला फारस महत्व नसतं । कारण प्रेमाच्या ओलाव्याने नात फुलत असतं... पण नात असल्याने त्यात प्रेमाचा ओलावा असतोच अस काही नसतं । आवडले. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा