Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज नव्याने

व — विश्वेश, Mon, 03/21/2011 - 05:38
आज पुन्हा नव्याने केली मी जुन्या गीतांची होळी आज पुन्हा नव्याने शिवली मी माझी फाटकी झोळी झालो सज्ज रचाया तुझ्यावर नवीन सुरेल गाणी उघडली पुरचुंडी अन, काढल्या जुन्या आठवणी जुनेच सूर जुनेच तराणे ... लिहितो मी शब्द नवे जुनाच पूर जुनेच बहाणे ... वाहतो मी तुझ्या सवे मुद्दाम झालो पूर्णपणे रिते ... आता टाकली ती कात लिहायचो पूर्वी प्रेम गीते ... आता टाकली ती जात कवितेमधून दिसती आता ... काही उरले ओले क्षण दिसते तगमग उरातली अन ... दिसते थरथरले मन फिरून नव्याने विणतो आहे तीच जुनी मी जाळी आज पुन्हा नव्याने शिवली मी माझी फाटकी झोळी आज पुन्हा नव्याने केली मी जुन्या गीतांची होळी

प्रतिक्रिया द्या
1205 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
प्रकाश१११ Mon, 03/21/2011 - 08:13 नवीन
छान .आवडले जुनेच सूर जुनेच तराणे ... लिहितो मी शब्द नवे जुनाच पूर जुनेच बहाणे ... वाहतो मी तुझ्या सवे पु.ले.शु
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 03/21/2011 - 13:48 नवीन
मस्त आहे कविता !साध्या सोप्या शब्दांत मांडणी केलीत हे जास्त आवडले ,अजुन येउ द्या :)
  • Log in or register to post comments
प
प्रास Mon, 03/21/2011 - 19:02 नवीन
कवितेमधून दिसती आता ... काही उरले ओले क्षण दिसते तगमग उरातली अन ... दिसते थरथरले मन
विश्वेशजी, दिसणारे मन थरथरले असावे की थरथरते? ..... एक साधीशी चौकशी.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/21/2011 - 19:55 नवीन
कविता छानच कवितेमधून दिसती आता ... काही उरले ओले क्षण दिसते तगमग उरातली अन ... दिसते थरथरले मन बेस्ट
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा