Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कविता ...!!

प — प्रकाश१११, Mon, 03/21/2011 - 06:32
चला मस्त तारुण्य फुललेय जरा मजेत जगूया कसे जगायचे त्याचे स्वातत्र्य घेऊया कशे प्रेम करायचे त्याचे गणित आपणच ठरवूया कशाला करायची कुणाची कॉपी आपण आपल्या पद्धतीने जगूया चला जरा मस्त सूर लावूया शोभादर्शक नि त्यात रंगीत काच तुकडे कसे छान शोभादर्शक बनते तसे काही तरी करुया प्रेमाचे क्षण आपल्याला हवे तसे आपल्या मनात मांडूया जमेल [?] खरेच जमेल ..! प्रयत्न करुया ..!! कशासाठी कुणाला लाजून प्रेमाचे सूर लपवायचे कुणावर असेल प्रेम तर कशासाठी दडवायचे ? ती आली त्या दिवशी कसे ढग भरून आले होते निळ्या निळ्या साडीमध्ये तिचे मन फुलत होते काळेभोर डोळे नि मस्त चेहरा तारुण्याचे एक निराळेच सौदर्य असते कसे ते बांधून ठेवते आई शप्पत शब्दांचे ताटवे मनात मस्त झुलत होते तिला हलकेच तो म्हणाला शब्दात तुला आता बाधून ठेवतो शब्दांच्या पिंजर्यात कोंडून ठेवतो हसून म्हणाली ती:- कसा बांधणार शब्दात मलां ..? शब्दात बांधताना स्वताच हरवून जाशील शब्द शब्द करीत मी कधी निघून जाईल मग शोधत बसशील ….?? खरेच होते का तिचे बोलणे ..? खरेच होते का तिचे बहाणे ..?? आता तो निराळेच शब्द शोधून ठेवतोय तिला बांधायचे कसे ....? ह्याचा विचार करून ठेवतोय ....!! शब्दात बांधताना ती खरेच निघून गेली कधी .? का ..? कोठे ..? कशी हरवून गेली .. शोधतोय तो तिला शब्दात तर नाही सापडली "अर्थात "मिळतेय का नाहीतर शब्दकोशात ...? शब्दकोशात ....! तरी शोधून बघुया ...!! पण ती नाही सापडणार त्याला हव्या त्या ठिकाणी ती झुलतेय फुलपाखरासारखी फुलांच्या भोवती ती झुळझुळ्तेय झाडापानातून ती तरंगतेय स्वप्नामधून नि तो शोधतोय तिला शब्दकोशात ... कशी सापडणार ती ...??

प्रतिक्रिया द्या
1360 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 03/21/2011 - 07:21 नवीन
मुक्तपणे आणि मोकळेपणाने मांडल्यामुळे मस्तच झालिये कविता... खुप आवडली.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 03/21/2011 - 08:21 नवीन
+१ :) :)
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 03/21/2011 - 13:45 नवीन
छान !:)
  • Log in or register to post comments
प
पिनुपवार Mon, 03/21/2011 - 19:37 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/21/2011 - 19:49 नवीन
ती आली त्या दिवशी कसे ढग भरून आले होते निळ्या निळ्या साडीमध्ये तिचे मन फुलत होते काळेभोर डोळे नि मस्त चेहरा तारुण्याचे एक निराळेच सौदर्य असते कसे ते बांधून ठेवते आई शप्पत शब्दांचे ताटवे मनात मस्त झुलत होते तिला हलकेच तो म्हणाला शब्दात तुला आता बाधून ठेवतो शब्दांच्या पिंजर्यात कोंडून ठेवतो हसून म्हणाली ती:- कसा बांधणार शब्दात मलां ..? शब्दात बांधताना स्वताच हरवून जाशील शब्द शब्द करीत मी कधी निघून जाईल मग शोधत बसशील ….?? खुपच आवडले हे मला .. अप्रतिम
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा