Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नेहमीसारखेच - ७

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Mon, 03/21/2011 - 07:32
नेहमीसारखेच - १ नेहमीसारखेच - २ नेहमीसारखेच - ३ नेहमीसारखेच - ४ नेहमीसारखेच - ५ नेहमीसारखेच - ६ नेहमीसारखेच - ७ आजही ती गौरवर्णी काया गहिवरली.... अगदी नेहमीसारखेच.... आजही त्या सावळ्याची प्रतीक्षा दाटली... अगदी नेहमीसारखेच... किती उत्कट व्हावे सारे रे.... इतकी कशी रे संध्या वेडी...पुढे सरकेच ना.... इतकी कशी रे अवनी अधीर झालेली.... सारे कसे सावळ्यासाठी आतुरलेले.... यमुनातीरावरील कदंबही आज बेचैन... कुणाकुणाला समजवावे आणि कुणी रे.... त्या गौरवर्णीच्या हृदयी वादळ कोंदाटले.... उरातून सारे कसे असे उचंबळले.... अवचित एक निळसर उत्तरीय दूरवर तरळले... एकाच गलका सा-या विश्वात उठला.... संध्या तृप्त अन् अवनी अवघडली.... कदंबाचे पानन् पान सळसळले.... ती गौरवर्णी तर संमोहित..... अन् नि:स्तब्ध... हे असेच होते.... सावळ्याची जादूच अशी कि..... अवघे विश्व व्यापते... नेहमीसारखेच.... ......... ............. अन्....मग ती गौरवर्णी हळू हळू.... सावळी होत जाते.... नेहमीसारखेच...अगदी नेहमीसारखेच.... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२१/०३/२०११)

Book traversal links for नेहमीसारखेच - ७

  • ‹ नेहमीसारखेच - ६
  • Up

प्रतिक्रिया द्या
2183 वाचन

💬 प्रतिसाद (7)
न
नगरीनिरंजन Mon, 03/21/2011 - 07:55 नवीन
छान! राधाकृष्णाचं प्रेम या चिरंतन काव्यरसिकप्रिय विषयाच्या परीसस्पर्शाने कविता नेहमीपेक्षा वेगळ्याच उंचीवर गेली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Mon, 03/21/2011 - 08:01 नवीन
नेहमीप्रमाणेच मस्त . आवडली !!
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 03/21/2011 - 13:55 नवीन
बाप रे !!!!!!! ही कविता नीट समजुन घेण्यासाठी आधीचे सहा भाग वाचावे लागतील .
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 03/22/2011 - 07:46 नवीन
न्हाई वो तै, प्रत्येक कविता वेगळी आहे. स्वतंत्र आहे. फक्त सादरीकरणाची पद्धत सारखी आहे. म्हणुन ति एका मालिकेत मांडतो आहे. बाय द वे, ही कविता कशी वाटली सांगितलेच नाहीत तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी
ग
गणेशा Mon, 03/21/2011 - 19:52 नवीन
छान
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 03/21/2011 - 22:04 नवीन
कविता खूप आवडली.
  • Log in or register to post comments
न
निनाव Mon, 03/21/2011 - 22:52 नवीन
नेहमीप्रंमाणेच... :) सुंदरच. काय मस्त सीरिज सुचली आहे तुम्हाला. वाह. म्हण्जे हे तुम्हाला सुचले , हे आम्हा रसिकांचे भाग्यच असेच बोलावे वाटते. सुंदर लिहिता तुम्ही. असेच वाचायला अजुन मिळु द्यावे :).
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा