Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

किती वेळ

स — सोनल कर्णिक वायकुळ, Mon, 03/21/2011 - 17:10
खिडकीच्या बंद तावदाना आडून अविरत कोसळणारा मुका पावूस बघतेय…किती वेळ. त्याने काचेला फासलेल धुकं रानाचा हिरवा रंग अजूनच गडद करतंय आणि विजेसारखे धारदार त्याचे शिंतोडे ठोठावतायत दार माझ्या जाणिवांच…किती वेळ कान बंद करून पावसालाच मुका ठरवायची सवय कधी लागली कोण जाणे? धुक्याआडची त्याची गडद गडद होत जाणारी जखम अजून किती वर्ष हिरवीच राहणार कोण जाणे? भिजून भिजून खंगलेल्या या दमट कोंदट खोलीत बसून हाच विचार करतेय…किती वेळ.

प्रतिक्रिया द्या
2615 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
प्राजु Mon, 03/21/2011 - 17:42 नवीन
खल्लास!! धुक्याआडची त्याची गडद गडद होत जाणारी जखम अजून किती वर्ष हिरवीच राहणार कोण जाणे? हे फार फार आवडलं. :) जियो!!
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 03/31/2011 - 00:31 नवीन
कविता आवडली. डोळ्यासमोर दृष्य उभे राहिले (असे वाटले).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ह
हर्षद प्रभुदेसाई Mon, 03/21/2011 - 17:53 नवीन
धुक्याआडची त्याची गडद गडद होत जाणारी जखम अजून किती वर्ष हिरवीच राहणार कोण जाणे? भिजून भिजून खंगलेल्या या दमट कोंदट खोलीत बसून हाच विचार करतेय…किती वेळ. ह्या चर ओळीतर फारच छान आहेत.... आवडली.....कविता.... जमल्यास माझी देखील कविता वचुन पाहा आवडले का ते.... (प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?....) जमल्यास तुमच ह्या बद्दलच मर देखील नोंदवा...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/21/2011 - 19:51 नवीन
खुपच करुण कविता .. पावसात ही मनाच्या तडफडीचे चित्र जबरदस्त दाखवले आहे
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 03/22/2011 - 08:01 नवीन
संपलो...
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 03/22/2011 - 08:10 नवीन
अप्रतिम यार.. पुन्हा एकापेक्षा एक ताकदवान क्रिएशन्स यायला लागल्या आहेत तुझ्याकडून.. आनंद वाटतोय. फारच खास.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 03/23/2011 - 14:40 नवीन
आवडले. :) राघव
  • Log in or register to post comments
क
काव्यवेडी Sun, 03/27/2011 - 18:38 नवीन
कान बन्द करुन पावसाला मुका ठरवायची सवय कधी लागली कोण जाणे !!! खूप मस्त कल्पना !!!! कविता खूप आवडली.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 03/31/2011 - 00:03 नवीन
कविता आवडली. हिरव्या जखमा!
  • Log in or register to post comments
S
sneharani गुरुवार, 03/31/2011 - 08:30 नवीन
मस्त कविता!
  • Log in or register to post comments
स
सोनल कर्णिक वायकुळ Sat, 04/09/2011 - 08:36 नवीन
सगळ्यान्चे खूप खूप आभार आणि नविन वर्षाच्या मनापासुन शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे Sat, 04/09/2011 - 09:23 नवीन
वायकुळताई व्याकूळ करुन टाकलत :( नविन वर्षाच्या तुम्हालाही मनापासुन शुभेच्छा
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 04/09/2011 - 16:53 नवीन
कान बंद करून पावसालाच मुका ठरवायची सवय
छान..
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 09/10/2011 - 03:02 नवीन
ही कविता वाचायची राहून गेली. धनंजयने उल्लेख केल्यामुळे ती उणीव भरून निघाली. पावसाला मुकं करून खंगत जाणाऱ्या खोलीतून त्याच्या हिरव्या जखमा बघायच्या.... अशाच शक्तिवान कविता अजून येऊदेत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा