Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे

प — प्राजु, Tue, 03/22/2011 - 04:15
टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे हासती का पाहुनी मज रोजला हे आरसे?? मैफ़िलीना मी सजवले प्राण माझे ओतुनी पण तरीही का कुणीही फ़िरकले ना फ़ारसे?? सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले? फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे?? 'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने?? मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!! पेटवूनीया चितेला सर्व आता पांगले सोबतीला राख आणी राहिले बस्स कोळसे!! एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!! - प्राजु *काल एक फोन आला.. "प्राजु तू कविता लिहिणे बंद केले आहेस की काय?".. म्हणून मग म्हंटलं मारावीच एक कविता मिपाकरांच्या माथी. :) *

प्रतिक्रिया द्या
6306 वाचन

💬 प्रतिसाद (42)
प
प्रीत-मोहर Tue, 03/22/2011 - 04:34 नवीन
मस्त ग तै!!!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 03/22/2011 - 04:37 नवीन
एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!! छान! 'मरण आले छानसे ' हे खूपच आवडले!
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 03/22/2011 - 05:30 नवीन
गजल म्हणून छान आहे, पण काय हे प्राजु? यह कैसी उदासी? बाकी, सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले? फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे हे मिपावर फीट्ट आहे!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/22/2011 - 15:46 नवीन
छे हो!! कसली उदासी आणि काय!! हे असच... ओळ सुचली मग लिहिलं! :) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
स
सुहास.. Tue, 03/22/2011 - 05:58 नवीन
रचना आवडली !!
  • Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_ Tue, 03/22/2011 - 06:06 नवीन
मस्त कविता प्राजु ताई....
  • Log in or register to post comments
S
sneharani Tue, 03/22/2011 - 06:14 नवीन
सुंदर रचना! मस्त!!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 03/22/2011 - 06:48 नवीन
मस्त !!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 03/22/2011 - 07:50 नवीन
मस्त! मस्त!! मस्त!!! खुप आवडली ही गजल. त्यातल्या त्यात:
एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!!
हे तर खासच!!
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Tue, 03/22/2011 - 08:36 नवीन
मस्त :) छानसे मरण कसे असते ?
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 03/22/2011 - 08:44 नवीन
ऑन डिमांड कविता/गझल वाह !!! हाडाची कवयत्री आहेस.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 03/22/2011 - 08:46 नवीन
कविता छानच आहे !! सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले? फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे हे विशेष आवडले.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/22/2011 - 09:32 नवीन
प्रत्येक शेर आवडला .. एकदम मस्त लिखान सांज होता, दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज, तेवणारा दीपही का विझतसे?? 'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने?? मी, 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!! खुप आवडले
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 03/22/2011 - 10:08 नवीन
मस्त गझल... व्वाह..
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 03/22/2011 - 10:17 नवीन
मस्त मस्त मस्त !
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Tue, 03/22/2011 - 12:31 नवीन
मस्त कविता ग प्राजुताई! छान छान!
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 03/22/2011 - 12:34 नवीन
मस्तच! बाकी तुमच्या कविता पण सरळ वाचायच्या का मर्ढेकरांच्या कवितांसारख्या? ;)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/22/2011 - 15:48 नवीन
अप साईड डाऊन करून वाचा.. म्हणजे शिर्षासनात ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Tue, 03/22/2011 - 15:49 नवीन
अप साईड डाऊन करून वाचा.. धन्यवाद! आता अर्थ लागला! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
असुर Tue, 03/22/2011 - 12:39 नवीन
झकास्स!!! मस्तच आहे!!! शेवटी त्या एकटेपणाची राख झाली हे बरे झाले!! -- असुर
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 03/22/2011 - 13:39 नवीन
छान आहे गजल. तुझ्या पुढच्या पुस्तकात ही समाविष्ट करावीस इतकी चांगली झालिये. पूर्वीचा नवखेपणा आता अजिबात जाणवत नाही. माझ्या म्हणण्याकडे तू सकारत्मकतेने पाहशील अशी आशा.;) रागावलीस तर तूला टाळण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नाही गो!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/22/2011 - 15:49 नवीन
कळलं हो बाई!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
व
विश्वेश Tue, 03/22/2011 - 13:46 नवीन
"भोगले जे दुख्ख" ची आठवण झाली, आपल्या पुढच्या अल्बम मध्ये येऊ द्या काही गझला
  • Log in or register to post comments
म
मराठे Tue, 03/22/2011 - 13:45 नवीन
मस्त
एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!!
जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी | मौत मेहेबूबा है, अपने साथ लेकर जाएगी |
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/22/2011 - 14:35 नवीन
सर्वच शेर एकदम जबरा आहेत. सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे?? अहाहा. और भी आने दो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मीली Tue, 03/22/2011 - 15:19 नवीन
सुरेख रचना ! सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले? फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे?? 'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने?? मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 03/22/2011 - 17:34 नवीन
याच द्विपदी विशेष आवडल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीली
र
राघव Wed, 03/23/2011 - 14:44 नवीन
असेच म्हणतो. :) राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
य
यशोधरा Tue, 03/22/2011 - 15:20 नवीन
सुरेख जमली आहे गजल, प्राजू.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/22/2011 - 15:50 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद कर्त्यांचे मनापासून आभार. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/22/2011 - 17:08 नवीन
ह्म्म... छान. :) ए जरा B +ve गझल वाचायला मिळेल का ?
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 03/22/2011 - 17:11 नवीन
वा! 'मरण आले छानसे' मस्तच! सुरेख जमली आहे. अजून येऊ दे! :)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 03/22/2011 - 17:56 नवीन
सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले? फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे?? 'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने?? मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!! अफाट शेर! गझल आवडली.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 03/22/2011 - 18:43 नवीन
गझल आवडली प्राजुताई, जरा 'भोगले जे दुख त्याला ' च्या जवळ जाणारी वाटली.
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Tue, 03/22/2011 - 21:31 नवीन
मस्त रचना, आवडली
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 03/22/2011 - 22:50 नवीन
खूप आवडली.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 03/22/2011 - 23:37 नवीन
गझल, सार्‍याच द्विपदी आवडल्या. मात्र खालील शेर फार सुरेख -
सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे??
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/23/2011 - 02:48 नवीन
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. :)
  • Log in or register to post comments
प
पियुशा Wed, 03/23/2011 - 05:55 नवीन
मस्त ग प्राजु ताइ :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 03/23/2011 - 08:52 नवीन
खुपच सुन्दर ओळीका (मला शेर म्हणायला आवडत नाही) गझल !
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 03/23/2011 - 09:44 नवीन
तुला फोन करून लिहायला लावणार्‍यांचे पण आभार.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/23/2011 - 14:57 नवीन
धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा