कलादालन

मानाचा मुजरा

Primary tabs

आज फाल्गुन वद्य तृतीया. महाराजांची ३८१ वी जयंती. या अलौकिक व्यक्तिमत्वाला समस्त मिपाकरांतर्फे आमचा मानाचा मुजरा. पवित्र जन्मस्थळ Image removed. Image removed. Image removed. जीवधन Image removed. रतनगड Image removed. Image removed. Image removed. सुधागड Image removed. Image removed. हडसर Image removed. Image removed. वासोट्याचा नागेश्वर Image removed. Image removed. राजमाचीवरून Image removed. Image removed. सिंहगड Image removed. Image removed. बुलंद, बळकट, बेलाग. पारतंत्र्यातून मुक्त झालेला पहिला भाग्यवान किल्ले तोरणा Image removed. जावळीच्या रानातला मकरंदगड Image removed. घनगड Image removed. घनगडावरून दिसणारा तैलबैला Image removed. बळकट रोहिडा Image removed. Image removed. Image removed. लांबलचक पट्टा उर्फ विश्रामगड Image removed. Image removed. बेलाग माहुली Image removed. पहिली राजधानी-राजगड Image removed. यांसम हाच-दुर्गदुर्गेश्वर रायगड Image removed. Image removed. Image removed. नतमस्तक Image removed.
प्रशु

श्री शिव चरणी मानाचा मुजरा..

वल्ली खुपच छान छायाचित्रे. तुम्ही स्वतः काढली आहेत का?

प्रचेतस

सर्व छायाचित्रे माझीच आहेत. रतनगडाचे एक छायाचित्र फक्त मामेभावाने काढलेले आहे.

मृगनयनी

वल्ली!... वरील छायाचित्रे खूपच छान आहेत! :)

क्षत्रियकुलावतंस गोब्राह्मणप्रतिपालक बहुजनोद्धारक प्रौढप्रतापपुरन्दर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा! :)

हरिप्रिया_

सगळेच फोटो मस्त...
आणि फोटो पाहता पाहताच स्फुरण चढले...
शिवरायांना मानाचा मुजरा आमच्याकडूनही..

स्पा

वल्या

सगळेच फोटू एकदम कडक ....
मस्तच आहेत यार...
जियो

महाराजांना दुसर्यांदा ह्याप्पी बड्डे !!!!

प.पु.

आमचापण त्रिवार मुजरा

मनीषा

सुरेख छायाचित्रे ...!

शिवछ्त्रपतिंना विनम्र अभिवादन !!

या भूमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्र धर्म राहीला कांही | तुम्हा कारणें ||

नन्दादीप

छायाचित्रे अप्रतिम...!!!

हर हर महादेव.....!!! कालच "संभाजी" वाचून पूर्ण केल, पुर्णपणे शिवकाळात वावरतोय अजून.....

शिवाजी महराज की जय...!!!

मॅक

पहीला छत्रपतींना...........
दुसरा तुमच्या फोटोग्रफीला......
तिसरा तुम्हाला ............
मानाचा मुजरा...

Nile

कड्यावर उभा असलेल्या मनुष्याचे सिल्युएट चित्र फार आवडले.

गणपा

काय शिंची कटकट आहे....
एक तर स्वतः पायाला भिंगरी लावल्या गत दर्‍याखोर्‍यांत फिरतात. फिरतात तर फिरुदे पण वर इकडे येउन असे उत्तम फोटू टाकुन आमची जळवतात.

विमुक्तासारखं किल्लेदार,जातीवंत भटका,योगेश२४,५० फक्त, वल्ली आदी लोकांना ही एखाद्या कोठडीत डांबुन ठेवाव वा नाना सोबत अज्ञात्वासासतरी धाडुन द्याव असा प्रस्ताव मांडत आहे.

VINODBANKHELE

अलौकिक व्यक्तिमत्वाचे अलौकिक स्मरण.......................

हायला... घनगडाला वरती जायला शिडी केव्हा बसवली?

वल्लीसाहेब मस्तच छायाचित्रे.. खुप खुप आठवणी जाग्या केल्यात...तुम्हीही माझ्या आवडिच्या जातकुळिचे निघालात.
यात पुरंदर, सिंधुदुर्गचे फोटो असायला हवे होते असे वाटुन गेले.... हरकत नाही. भाग दोन म्हणुन अजुन काही किल्ल्यांचे फोटो टाका.

प्रचेतस

घनगडाला साधारण ७/८ महिन्यापुर्वीच शिडी बसवलीये.
पुरंदरला गेलो होतो तेव्हा डीजीकॅम नव्हता. सिंधुदुर्गाचे दर्शन घ्यायला जायचे आहे अजून.
तो योग लवकरच येवो अशी प्रार्थना करतोय महाराजांपाशी.

मस्तच !!
सगळे फोटो अप्रतिम !!!

शिवरायांस आम्हा पामराचा मानाचा मुजरा ....

श्रीशिवरायाचा जयकार

सह्याद्रीवर घुमतो अजून
तुझ्या शौर्याचा हुंकार ...
श्वासाश्वासातून निघतो
श्रीशिवरायाचा जयकार ...

म्लेंच्छांनी घातले घाव
घाव मातृभूमी वरी ..
परदास्याच्या अंधःकारातून
पेटला स्वातंत्र्याचा रवी ...

घेऊनी रामदासी मंत्र
गर्जला हा नृसिंह असा ...
दुमदूमला आसमंत सारा
थरथरल्या दाही दिशा ...

मावळे मराठे मर्द
झुंजले अर्पुनी प्राण ...
रोवले छातीत मोघलांच्या
तेजस्वी भगवे निशाण ...

तासिले कडे अभेद्य
घडविले दुर्ग बेलाग ...
सळसळती मनगटे मराठी
अन् समशेर ओकते आग ...

हिंदवी स्वराज्याचा ज्यानी
थाटला संसार साजरा ...
त्या जाणत्या राजांस करितो
मानाचा त्रिवार मुजरा ...
--- वेडा कवी - अमोल (जातीवंत भटका ...)

ज्ञानराम

शिवछत्रपतींना मानाचा मुजरा....

फोटो जबरदस्त आलेत.......

वपाडाव

हा धागा कसाकाय सुटला होता कोण जाणे....

पण एकंच बोल्तो...
अव्वल

गणेशा

शिवछत्रपतींना मानाचा मुजरा....

फोटो जबरदस्त