विडंबन

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम गझलफक्त मी नावास कर्ता शेष आताबायको ही लांडगा मी मेष आताकेस पिकले, दात पडले, भिंग सजलेकेव्हढा बदलून गेला वेष आताम्हैस ही बसते, पुन्हा उठतेच कोठे!!आणि लाजेचा न उरला लेश आतारोज नवऱ्यांनो, अता ऱ्हावा उपाशीबायकांनी काढला आदेश आताएकही ना ठेवला खात्यात पैसाआणि बचतीचा मला उपदेश आतासारखी येते तिला ऊर्मी लढ्याचीराहिला नाही मला आवेश आताघास उतरावा कसा खाली घशाच्या?काल चे सारे, न काही फ्रेश आतासासरा, दारू, विडी, आणीक, लफडीसोड ते, "केश्या", जरा कर श्लेष आता

केशवा. मस्त हाणलेस रे!

फक्त मी नावास कर्ता शेष आता
बायको ही लांडगा मी मेष आता

एकही ना ठेवला खात्यात पैसा
आणि बचतीचा मला उपदेश आता
ह्या ओळी तर जबराच

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

सारखी येते तिला ऊर्मी लढ्याची
राहिला नाही मला आवेश आता

घास उतरावा कसा खाली घशाच्या?
काल चे सारे, न काही फ्रेश आता

व्वा रे भिडु.....मस्तच......

मदनबाण.....

छान, मूळ गजलेतल्या प्रत्येक शेराला विडंबन प्रतिशेर (किंवा शेराला 'सव्वाशेर' ;)!

(स्वगत - आता ह्या गजलेला छान म्हणून मी घरी एक नवे भांडण ओढवून घेणार की काय? :?)

चतुरंग

छान, मूळ गजलेतल्या प्रत्येक शेराला विडंबन प्रतिशेर (किंवा शेराला 'सव्वाशेर' !)

असेच म्हणते.
विडंबन आवडले..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

एकही ना ठेवला खात्यात पैसा
आणि बचतीचा मला उपदेश आता

झकास.
सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी
हे उल्लेखाला आलेच की :)

प्रतिक्रिया न दिलेला एक लिहीतो आहे.
आतापर्यंत वाचलेच नव्ह्ते. वाचल्याबरोबर लिहावेसे वाटले.
अतीउत्तम. आणखी येऊदे.
एकही ना ठेवला खात्यात पैसा
आणि बचतीचा मला उपदेश आता

बचके रहना रे बाबा बचके रहना रे!

माला पन थोड बोलयच आहे

कराया गेलो सुखानचि बेरीज
राहीले न काही शेष आता !!!!

पुर्षाथाला ही वाटे लाज
पाहुन माझे अवशेष आता !!!!