Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

त्रैराशिक ....

व — विश्वेश, Wed, 03/23/2011 - 05:02
आठवत नाही ध्येया मी कधीचे तुझ्या मागे धावतो आहे तू पुढे कि मी माहित नाही पण सवय म्हणून जगतो आहे न तुला थकायची सवय राहिली न मला थकायची सवड एकमेकांभोवती फिरता फिरता होते दोघांचीही परवड जगण्याची हि युद्ध नीती मी शिकलो आईच्या पोटात उमगले नाही मलाच कधी शिरलो ऐहिकाच्या गोटात मिळाले भरभरून सगळे तरीही मी अजून मागतो आहे ... मन मारून केलेल्या सौद्यांना अन वचनांना जागतो आहे आज उमगले खरं तर, जगण्याच्या त्रेराशिकात मी सुखाला उपभोगाने भागतो आहे

प्रतिक्रिया द्या
1473 वाचन

💬 प्रतिसाद (5)
न
नगरीनिरंजन Wed, 03/23/2011 - 05:45 नवीन
जगण्याच्या त्रैराशिकात मी सुखाला उपभोगाने भागतो आहे :) छान कल्पना! कविता आवडली!
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Wed, 03/23/2011 - 06:06 नवीन
छान आहे कविता .सर्वच कडवे आवडले :)
  • Log in or register to post comments
S
sneharani Wed, 03/23/2011 - 06:20 नवीन
मस्त कविता!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 03/23/2011 - 08:20 नवीन
आठवत नाही ध्येया मी कधीचे तुझ्या मागे धावतो आहे तू पुढे कि मी माहित नाही पण सवय म्हणून जगतो आहे अप्रतिम ओळी .. आवडल्या .. अवांतर : त्रैराशिक म्हणजे काय ? प्लीज सांगता का ?
  • Log in or register to post comments
व
विश्वेश Wed, 03/23/2011 - 09:43 नवीन
त्रैराशिक म्हणजे proportion
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा