Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

व्यापार

क — क्रान्ति, Wed, 03/23/2011 - 19:09
केला सुखाचा व्यापार दु:ख झाले, तोटा झाला झोळीभर पश्चाताप, खरा दाम खोटा झाला ! देवा, जगणं रुचंना काय करावं सुचंना भल्या सुपीक डोक्याचा नर्मदेचा गोटा झाला ! तोंडावर लाडीगोडी पाठ फिरताच खोडी असे ग्राहक भेटले, ठकसेन छोटा झाला ! जमा अक्कलखात्यात, तुझी सावकारी त्यात हात बुद्धीचे गहाण, उभा जन्म थोटा झाला ! कधी केली ना लाचारी, आज देणेकरी दारी ऐकती ना विनवण्या गोंधळ वांझोटा झाला ! खुळ्या मनाचं ऐकून दिलं आयुष्य झोकून झाले भणंग, भिकारी मुद्दलात तोटा झाला !

प्रतिक्रिया द्या
2587 वाचन

💬 प्रतिसाद (11)
न
नगरीनिरंजन गुरुवार, 03/24/2011 - 00:14 नवीन
वा! मस्त कविता!
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 03/24/2011 - 00:34 नवीन
कविता आवडली. तुकोबांना एखाद्या बेसावध क्षणी असं कधी वाटून गेलं असेल का, असा प्रश्न मनात डोकावला.
हात बुद्धीचे गहाण, उभा जन्म थोटा झाला !
हे खासच.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 03/24/2011 - 00:35 नवीन
मस्त कविता... खुळ्या मनाचं ऐकून दिलं आयुष्य झोकून झाले भणंग, भिकारी मुद्दलात तोटा झाला ! हे वाचताना, "स्वतः भोवती गिरक्या घेता, अंधपणा की आला, तालाचा मग तोल कळेना, सादही गोठून गेला" ह्या ओळी आठवल्या...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 03/24/2011 - 02:09 नवीन
फारच सुरेख... :)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त गुरुवार, 03/24/2011 - 06:47 नवीन
कविता छान झालीय, पण फार एकसुरी वाटते आहे ग. खुळ्या मनाचं ऐकून दिलं आयुष्य झोकून झाले भणंग, भिकारी मुद्दलात तोटा झाला ! खुळ्या मनाचं ऐकुन, जरी आयुष्य झोकुन दिलेलं असलं तरी, मुद्दलात तोटा झाला हे समजावणारा मेंदुच होता ना, मुद्दलाचे आणि तोट्याचे हिशोब त्या मनाला कधीच क़ळ्त नसतात, किंवा ते कळुन घेत नसतं.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 03/24/2011 - 08:17 नवीन
चांगली कविता. बऱ्याच दिवसांनी?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 03/24/2011 - 08:34 नवीन
झकास ग तै :) आणि हो भेलकम बॅक. आता गायबु नको परत.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी गुरुवार, 03/24/2011 - 11:16 नवीन
>भल्या सुपीक डोक्याचा नर्मदेचा गोटा झाला ! :) आवडले .
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 03/24/2011 - 18:03 नवीन
खुळ्या मनाचं ऐकून दिलं आयुष्य झोकून झाले भणंग, भिकारी मुद्दलात तोटा झाला ! क्लास!! सुरेख!
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 03/25/2011 - 00:46 नवीन
परत क्रांतिताई लिहीत्या झाल्या हे बघून आनंद झाला.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 03/25/2011 - 03:08 नवीन
हात बुद्धीचे गहाण, उभा जन्म थोटा झाला ! हे छान. मात्र एरवी तुमची कविता वाचली की दाद देण्यासाठी काव्यपंक्ती स्फुरतात, तसं आज झालं नाही. कविता वाचून इब्ने इन्शाची एक कविता आठवली. तीतदेखील सावकारी, कर्ज, व्याज ही रूपकं वापरली होती. अर्थात साम्य इथेच संपतं, कारण आशय वेगळा होता.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा