Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा रात्र

न — निनाव, गुरुवार, 03/24/2011 - 05:35
रात्रीचं पांघरूण किती छान असतं सर्व काही कसं निवांत असतं असतं आतुन अलगद ऊबदार मात्र, वर वर कसं गार असतं झोपायची घाई असतेच कुणाला ते स्वप्न पडायचं एक दार असतं अजुनच बहरते रात्र सांगु? जेंव्हा चंद्र तुझ्या सारखं गोरं पान असतं तु सोडले असावे केस मोक़ळे असाच काहिसा भास असतं एकटेपणाची सोबत लागते गोड तारुण्याचं बोलकं पान असतं मारतं मग कुणी चांदण्यांशीच गप्पा तीच समोर असा ठाम विश्वास असतं रात्रीच्या पांघरुणात एक मात्र कमाल असतं अंधारात तिचं यौव्वन कसं साफ दिसतं तु कुठे दिसली, काय बोलली, हसली सगळ्याचं रिपीट टेलिकास्ट असतं रात्रीचं पाघरुण असंच लाजवाब असतं सगळ्या वयाला एकसमान असतं सडा पडतो रात्री तिच्या सुगंधा चा मनी म्हणून तर रातराणीचं झाड असतं रात्रीचं पांघरूण किती छान असतं सर्व काही कसं निवांत असतं असतं आतुन अलगद ऊबदार मात्र, वर वर कसं गार असतं...
  • पुन्हा रात्र (२)

Book traversal links for पुन्हा रात्र

  • पुन्हा रात्र (२) ›

प्रतिक्रिया द्या
2838 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
प्रकाश१११ गुरुवार, 03/24/2011 - 06:40 नवीन
निनाव - छान कविता जमलीय . आवडली..!!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 03/24/2011 - 06:45 नवीन
>>चंद्र तुझ्या सारखं गोरं पान असतं तुम्हाला 'चांदणं तुझ्या सारखं गोरं पान असतं' असं म्हणायचंय का? की 'चंद्र तुझ्या सारखा गोरा पान असतो' असं म्हणायचंय? या वाक्यामुळे कविता कानडी माणसाने लिहील्याचा आभास झाला.
  • Log in or register to post comments
न
निनाव गुरुवार, 03/24/2011 - 23:31 नवीन
न. नि. : :) तुम्ही मस्त पकडलंत. काल कविता अर्धवट सोडली होती, आज पुर्ण केली आहे.. - आ. निनाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ज
ज्ञानराम गुरुवार, 03/24/2011 - 09:35 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी गुरुवार, 03/24/2011 - 11:18 नवीन
कविता छान लिहिली आहे पण अजुन थोडी मोठी हवी होती मजा आली असती .
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 03/25/2011 - 11:17 नवीन
खुप खुप आवडली कविता ..मनापासुन .. पुन्हा वाचाली खुपच छान वाटली ... कालच कविता वाचली होती.. अर्धवट , निटशी वाटली नव्हती .. आवदली नव्हती म्हणुन रिप्लाय केला नव्हता.. आज सहज पाहिले तर अरेच्चा .. नविन कडवी अ‍ॅड झालेली .. मजा आली सगळॅ वाचताना .. काही ओळी तर अप्रतिम एकदम मनात घर करणार्‍या आहेत .. असेच लिहित रहा .. वाचत आहे ..
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Fri, 03/25/2011 - 20:43 नवीन
झोपायची घाई असतेच कुणाला ते स्वप्न पडायचं एक दार असतं
- वा वा!
  • Log in or register to post comments
व
वैशाली . Sun, 03/27/2011 - 08:08 नवीन
"तु कुठे दिसली, काय बोलली, हसली सगळ्याचं रिपीट टेलिकास्ट असतं" बरोब्बर!! :)
  • Log in or register to post comments
व
वैशाली . Sun, 03/27/2011 - 08:09 नवीन
"तु कुठे दिसली, काय बोलली, हसली सगळ्याचं रिपीट टेलिकास्ट असतं" बरोब्बर!! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा