Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ससा आणि कासव -

व — विदेश, गुरुवार, 03/24/2011 - 07:36
पांढरा शुभ्र कापूस जसा इवला पिटुकला होता ससा लाजरा बुजरा भित्रा जरा अवखळ चपळ होता ससा एकदा मळ्यातून फिरता फिरता गेला तो तळ्याकाठी तडक इवल्या पिटुकल्या सशाला दिसला मोठा एक खडक खुदकन ससा मनात हसला ऐटीत खडकावरती बसला थोड्या वेळाने झाली गम्मत सशाला वाटली जम्माडी जम्मत खडक लागला हलायला ससोबा लागले डुलायला अचानक घडले तरी काय सशाचे थरथरले की पाय सशाला वाटले झाला भूकंप त्याच्या अंगाला सुटला कंप पाहिले त्याने पायाखाली जीव झाला वर खाली नव्हता पायाखाली खडक होती कासवाची पाठ टणक कासवाने हलवली हळूच मुंडी ससोबाची उडाली घाबरगुंडी धूम ठोकली सशाने मळ्यात कासव निघाले निवांत तळ्यात

प्रतिक्रिया द्या
3194 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ज
ज्ञानराम गुरुवार, 03/24/2011 - 09:37 नवीन
मस्त.....
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी गुरुवार, 03/24/2011 - 11:21 नवीन
विदेशाले विदेशा लिहतोस कसा ?कवितेचा विषय घेतोस ससा मस्त हं ,नविन बालगीत मिळाले :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 03/24/2011 - 11:31 नवीन
हा हा हा मस्त एकदम.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई गुरुवार, 03/24/2011 - 16:44 नवीन
सुंदर...सुंदर.....
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 03/25/2011 - 07:41 नवीन
बालकविता मस्तच एकदम.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 03/25/2011 - 07:45 नवीन
एकदम छान बालगीत ..आवडले
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 03/25/2011 - 07:46 नवीन
एकदम छान बालगीत ..आवडले
  • Log in or register to post comments
न
निनाव Fri, 03/25/2011 - 07:53 नवीन
वाह वाह... मस्तच. एकदम सुंदर. एक नंबर! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा