पाककृती

<जराथांबा>

Primary tabs

प्रेरणास्रोत

साहित्य: एक मोठ्ठा पूर्णविराम, कंपूबाज, विचार, अ‍ॅटीट्युड, दोन कंस, त्यावर ठोकता येईल असे enter बटन, किस्सा परदेशगमनाचा , दुसऱ्यांच्या खरडवह्या उचकून सापडलेल्या कुरापती, मायदेशातील आठवणी.
कृती: Text box मध्ये विचार उकळण्यास ठेवावे. पूर्णविरामाचे सर्वमान्य वापर विसरून जावे अथवा न विसरता अधून मधून text box मध्ये भरावेत. किती झाले आहेत ते बघून घ्यावेत.
पूर्णविरामांच्या संख्येनुसार प्रतिसादाचे काठीण्य बदलते. पूर्णविरामाने भागत नसल्यास दोनास एक अथवा पावपट किंवा जास्ती enter key ठोकावी. विचार अर्धवट उकळल्यावर कंसात आपल्या आठवणी पसराव्या.
लक्षात ठेवून शुद्धलेखनात चूक करावी. एका पूर्णविरामासाठी ८ चुका कराव्यात. कमी चुका केल्यास प्रतिसाद सोपा होईल.
गडबडलेला प्रतिसाद तसाच ठेवून एक बिअर पेक्षा महाग कॉफी प्यावी.
आता दुसऱ्या कंसात परदेशगमनाचा किस्सा व मायदेशातील आठवणी टंकाव्यात. तीन चार आठवणी झाल्यावर मगाशी अर्धवट लिहिलेला प्रतिसाद त्यात घुसडावा. कम्पूबाजांच्या नावाने बोटे मोडत राहावे. आठवतील तशा कुरापती टंकाव्यात.
लिहून झालेला प्रतिसाद पुरेसा असंबद्ध वाटला की टंकणे बंद करावे. प्रकाशित केल्यावर प्रतिसाद अजून असंबद्ध दिसणार आहे हे लक्षात असू द्यावे. पूर्वादृश्याकडे दुर्लक्ष करून प्रतिसाद प्रकाशित करावा.

टीपा: १.पूर्णविराम देण्यासाठी जर्मन की बोर्ड वापरावा. माझ्याकडे तसा नसल्याने प्रतिसाद खूपच सोपा झाला.
२. प्रतिसाद खूपच सोपा वाटल्यास नवीन जोडशब्द शोधून दोन आठवणींच्या मध्ये टाकावा.
३. प्रतिसाद प्रकाशित करून झाल्यावर उपप्रतिसाद देण्या आधीच कंपूबाजांविरुद्धच्या विचारांनी भारून जावा. म्हणजे वर्षभर वाचक थकेल.
४. प्रतिसाद लिहिण्यासाठी गेंड्याचे कातडे पांघरावे म्हणजे अ‍ॅटीट्युड बदलून तुम्ही व्यवस्थित लिहायला जाणार नाही.

Nile

हीच पाककृती अटीट्युड न घालता करता येईल का? आम्हा निरागस लोकांसाठीपण पाकृ देत जा की हो! . =))

नंदन

खी: खी: खी:
अजून एक यशस्वीरीत्या पेललेले आव्हान :).
[ह्या खेपेला शतक नक्की म्हणावे काय? ;)]

Nile

थर्ड अंपायरच्या रिव्ह्यु नंतर नॉट आउट राह्यल्या बद्दल अभिनंदन अन शतकासाठी शुभेच्छा! :-)

नगरीनिरंजन

मस्त पाकृ! पुढच्या लेखनाचा बेत पक्का झाला!

स्पंदना

प्रतिसाद द्यावा की न द्यावा?

नाही म्हणजे दिल्यावर उगाच आरोप तर नाही ना व्हायचे?

काय आहे आम्ही सर्वसाधारण माणस आहोत राव. एव्हढ चाम्गल लिहुन तुम्ही आम्हाला कचाट्यात पकडता ना ?

विकास

पटले तर आहे. पण सहमत असे म्हणावे का न म्हणावे? नाहीतर त्याबाबतीत पण कंपूबाज ठरेन... :(

सूड

नेहमीपेक्षा वेगळी पाकृ.
(गेंड्याचे कातडे वैगरे वापरायचे असल्याने नॉन-व्हेज कडे झुकल्यासारखि वाटतेय) .त्यामुळे करु की नाही ही नवी शंका उभी राह्यलीये.
आणि एक, नाकाने सोललेल्या कांद्यांची जर आधी चरचरीत फोडणी केली तर पाकृ चा खमंगपणा अधिक वाढेलसे वाटते.

रेवती

धन्य आहेस रे बाबा!
फोटोशिवाय दिलेल्या पाकृला एरवी आम्ही प्रतिसाद देत नाही.
या धाग्याला मौजमजेचेच प्रतिसाद यावेत ही अपेक्षा.

मृगनयनी

पु ले शु

:) इतक्या विचारपूर्ण संयमित प्रतिक्रियेबद्दल आभार! आणि अभिनन्दन!!

.
.
.

याला. म्हण.
तात.. खिलाडु (वृत्ती) ;)

५० फक्त

छान पाकक्रुति, हे अंडे न घालता कसे करता येईल याबद्दल कोणि मार्गदर्शन करेल का ?

तयारी करताना काढलेल्या फोटोत जे बांगड्या घातलेले हात दिसत आहेत ते कोणाचे अशी एक अंमळ शंका आली, प्राचीन भारतीय उपखंडातल्या प्रथेनुसार रंगपंचमीला मोठ्यांना नमस्कार करणारे वाटत नाहीत.

बाकी, पाकक्रुती उत्तम. मिपावरील प्रतिथयश डॉक्टरांनी सदर पाकक्रुती खाल्यावर किंवा न खाता न पचल्यास काय करावे याचे उपाय द्यावेत ही नम्र विनंती.

विकास

छान पाकक्रुति, हे अंडे न घालता कसे करता येईल

यात "घालता" च्या ऐवजी "फेकता" हा शब्दप्रयोग कसा वाटतो? :-)

प्रीत-मोहर

मला देखील ही पाकृ अंड न घालता कशी करावी हा प्रश्न पडलाय..तर पा़कृलेखकाने थोडास खुलासा करावा ही विनंती

बाकी पाकृ म्हंजे पाकृ..सही !!!

तोंपासु!!

हे हे हे ............बास की आता...... एखाद्याला काय सारखीच टपली मारायची का??? ऑ.

पाककृती मस्तच वाटते आहे. वाचूनच तोंडाला पाणी सुटलं.

मात्र साहित्यामध्ये एक मोठ्ठा पूर्णविराम घ्यायला सांगितला आहे. त्याचा चुरा करून भुरभुरवायचा का?

तुमच्या हातचे रसाचे ग्रहणे, व विडाचे अंबन हे पदार्थदेखील खाल्ले आहेत, व अतिशय आवडले आहेत. त्यांचीही कृती द्याल का?

शिल्पा ब

यावेळेस १००वा प्रतिसाद माझ्यासाठी राखुन ठेवला आहे याची नोंद घ्या.

पैसा

लंबूटांग लिहिते झाले हे पाहून अत्यानंद जाहला! पाकृ जमली आहे हे सांगायला नकोच. फक्त ती सगळ्याना पचते का हे पाहणे मनोरंजक ठरेल.

(लंबूटांग यानी रेवतीच्या धाग्यावर ४/५ प्रतिसाद दिले आहेत, त्यामुळे रेवतीने आता त्याची परतफेड करणे अपेक्षित आहेच!)

चिंतामणी

(लंबूटांग यानी रेवतीच्या धाग्यावर ४/५ प्रतिसाद दिले आहेत, त्यामुळे रेवतीने आता त्याची परतफेड करणे अपेक्षित आहेच!)

आपली गणना अभ्यासू लोकात होणार आता.

आंसमा शख्स

थांबवा हे. असे योग्य नाही. अशी कुणाची खिल्ली उडवू नका. आवडलेले नाही.
काही चांगल्या कामासाठी आपली उर्जा खरच करा. आयुष्याच्या शेवटी आठवायचे झाले तर खुदाला सांगण्यासाठी काही चांगले कामे आठवतील असे पाहा.
कसे लिहावे यासाठी काही नियमावली येथे का नाही?
येथे संपादक आहेत असे म्हणतात ते हे प्रकार थांबवत का नाही? त्यांनी नाही पाहिले तरी खुदा पाहत असतो हे ध्यानात ठेवा.

वपाडाव

परदेश गमनाचे तिकिट बुक करुन आल्यात वाट्टे म्याडम...
येणार ना पुन्हा परत, भेटु मग !!!
रच्याकने...
पर्भणीचं हवाई तिकिट किती रुपये आहे?...

मस्त वाटली कृती... साखरांब्यापेक्षा गोड आहे... रंग बाकी असा नसतो, थोडासा फाकलेला असतो. आर्टीफीशीयल रंग नाही वापरत तरीही...

गवि

चेष्टा मस्करी वाईट नाही. पण एखाद्याला नाही आवडत तर कशाला त्याची खेचायची ते मला कळत नाही. मागील धाग्यावर खरेच निखळ उद्देश होता.पण इथे?

सविता

पण कोणीतरी म्हटलाय ना...की तो या लेखकाच्या सर्व लेखांचे रसग्रहण करणार आहे?

मग आम्हाला या पाककॄतीचे रसग्रहण वाचायला आवडेल की!

डब्बल विडंबन होईल की ते... मज्जाच मजा!

एक पदार्थ राहिलाच, विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहायचा नाही, जोडशब्द वेगवेगळे लिहायचे. उदा: "कुरा पत" शब्दाचं स्पेलिंग जरा नीट करा.

मी मागे इंग्लंडमधल्या चायनीज सुपरमार्केटमधे भाजी आणि साबुदाणे आणायला गेले होते तेव्हा तिथे एक इथिओपियन बाई भेटल्या. त्यांनी मला त्यांच्या देशातही साबुदाणे आणि भाजी वापरून एक पदार्थ बनवतात त्याची पाककृती दिली होती. ही पाककृती मी माझ्या पोलिश मित्राला सांगितली तेव्हा त्याला त्याचं आश्चर्य वाटलं.

या प्रसंगाची आठवण सदर धागा बघून झाली.

वपाडाव

ती पाकृ खायचं आमंत्रण काय ब्राझीलच्या पेलेला बोलावताय का अर्जेंटिनीयन मॅराडोना येणारंय ?
अवांतर : आश्चर्य फ्रेंचमध्ये वाटलं का डच मध्ये...
-(आश्चर्यचकित व्लादिमीर पुतिन)

मृत्युन्जय

याला म्हणतात बोट घालुन ओकार्‍या काढणे. एक धागा झाला ना आता? मग दुसरा कशाला हवा होता. लंबुटांग तुम्हारा चुक्याच, बाकी चालु द्यात.

वपाडाव

याला म्हणतात बोट घालुन ओकार्‍या काढणे.

किती घाण्न प्रतिसाद देता हो काका?
वमन म्हणा, पर्वाच प्रौढ शिक्षणाचे क्लास घेतले ना विजुबौंनी !!

नन्दादीप

@ मृत्युन्जय....
हेच टंकायला आलो होतो.

sneharani

एकदा झालीये ना मस्करीची कुस्करी मग परत कशाला?

गणपा

नक्की एकदा ठरवा बर तुम्ही काय काय टंकायला इथे आला होता ते. :)

Nile

हेच टंकायला आलो होतो.

गण्याक काळजी...!!!

पक्या

बास की आता. एका सदस्याला टारगेट करून किती खेचायची त्याची आणि वर परत त्यालाच म्हणायचे हलके घे.
हे आता अति होत चाललयं.
संमं , इथे कॄपया दखल घ्या.

गणेशा

कोणाला तरी टार्गेट करुन जेंव्हा आपण सारखेच तसे वागतो तेंव्हा आपणच आपले प्रदर्शन मांडत आहोत हे लक्षात येत आहे ..
असो चांगल्या लिखानाची अपेक्षा...

आत्यंतिक सहमती !
टवाळकी करण्यासारखे एखादा वागला असला, तरीही एकदा शब्दाचा मार देऊन थांबणे उचित.
सध्या चालू आहे, त्याने काही सकारात्मक घडेल, वातावरण पुन्हा गंमतीचे होईल असे खरेच वाटते का?

चिंतामणी

ह्या प्रकारामुळे कुठलाही दर्जेदार नवीन लेख/धागा गेल्या ४-५ दिवसात आला नाही.

१. इब्राहमी धर्म - ... भाग ३
२. प्रांताच्या गोष्टी
३. असा हा पूर्वांचल
४. अंताजीची बखर - ऐतिहासिक महत्त्वाची ऐतिहासिक कादंबरी
हे लिखाण, इथले प्रतिसाद दर्जेदार नाहीत असा तुमचा समज आहे का? दर्जेदार म्हणावेत असे धागे मिपावर काय वारंवारितेने येतात याचा तुम्ही अभ्यास केला आहात का? अभ्यास न करताच इतरांना झोडण्यात काय हशील आहे? का तुम्हाला तेच करण्यात रस आहे?

ह्या प्रतिसादाला पूरक प्रतिसाद देत आहे .
हे लेख दर्जेदार आहेत ह्याबाबत सहमत
ह्या सर्व धाग्यांमध्ये शतकी प्रतिसाद मिळवण्याची शमता आहे .ह्यात वाद नाही .( लेख व प्रतिसाद हे वाचनखुणा म्हणून साठवण्याच्या योग्यतेचे आहेत असे मला वाटते .)
पण आजकाल मिपावर कंपूबाजी होत असल्याने अनेक लेखांमध्ये अनावश्यक प्रतिसाद दिले जातात .मूळ लेखाचे गांभीर्य नष्ट होते .
त्यामुळे वातावरण गढूळ होते .मग ते प्रतिसाद उडवले जातात .
माझ्या वाक्यांची सत्यता तुम्ही जो पहिला लेखाचा दुवा दिला आहे .
त्या लेख मालिकेत सुरवातीला हा प्रकार झाला आहे

मिपावर कंपूबाजी नवीन नाही तेव्हा आपल्यामुळेच कंपूबाजी सुरू झाली असा (गैर)समज ठेवू नये. मिपाच्या जन्माच्याही आधीपासून मराठी आंतरजालावर कंपू आहेत आणि मिपावरही अनेक कंपू निर्माण झाले.

अनेक चांगल्या लेखांवर कंपूबाजही प्रतिसाद देतात. पण अर्थातच आपल्या कंपूतल्या लोकांचे लेख प्राधान्याने उघडले जातात, कारण समविचारी असण्यातूनच कंपू निर्माण व्हायला सुरूवात होते. जो कंपू आकाराने मोठा त्यांचे प्रतिसादही सगळ्यात जास्त दिसतात.

कंपूतल्याच लोकांची टर उडवण्याचे प्रकार तुम्हाला माहित नसतील तर जुने धागे उघडा आणि पहा, इथे मैत्रीखात्यातच चिक्कार खेचाखेची चालते. दुवा १, दुवा २, इत्यादी.

ज्या कंपूच्या नावाने तुम्ही खडे फोडत आहात त्या कंपूत सगळी स्वतंत्र विचारांची माणसं आहेत, त्यांचेही आपसात मतभेद आहेत आणि कोणा एका आयडीला त्रास देण्याएवढंच त्यांचं विश्व मर्यादित नाही.

मिपावर उगाचच कोणीही कोणालाही टार्गेट करताना दिसत नाहीत. असं क्वचित कधी दिसलं तर इतर अनेक जबाबदार लोकं असं करणार्‍यांची उघड, व्यनीतून, फोनवरून कानउघाडणी करतात. "... माझ्याकडून एक मस्तानी..." हे वाक्य खरडवहीत वाचलंत तसं "किती वेळ एकच झाड पकडून बसणार आहेस" वगैरे वाक्य तुम्ही कधी वाचली असलीत तर त्यांचाही विचार करा.

राहता राहिला मुद्दा सकस साहित्याचा, तर कोणीतरी एकजण शुद्धलेखन, विरामचिन्ह, परिच्छेद पाडणं, यांचे सर्वमान्य आणि सरकारमान्य नियम धाब्यावर बसवतो त्याचा विचार करून चांगलं लिहीणारे आपलं लिखाण थांबवणार नाहीत वा ते मिपावर प्रकाशित करणंही थांबवणार नाहीत. जसा या अंधश्रद्धेचे काय करू? या धाग्यावर दंगा सुरू होता तसेच इब्राहिमी धर्म धाग्यावर चर्चाही सुरू होती/आहे.

याउप्पर तुम्हाला कंपूबाजी, अवांतर, इत्यादींबद्दल तक्रारी करायच्या असतील तर करत रहा. सभ्य शब्दांत, "आतातरी मोठे व्हा" या वाक्याचा अर्थ सविस्तर सांगणं मला शक्य नाही. तेव्हा लेखनसीमा.

तुम्ही येथे हे दोन दुवे देऊन फार चांगले कार्य केले आहे .
माझा मुद्दा सभ्य भाषेत मला मांडता येईन . कंपूबाजी पूर्वी पण होती हे मान्य पण तुम्ही माझ्याविरुद्ध सुरु केलेली कंपूबाजी ही सुडाची परी सीमा होती
( मूळ तुमच्या पहिल्या दुव्यात प्रत्येकाने विडंबन का आवडले हे सभ्य भाषेत लिहिले आहे )
>पहिल्या दुव्यात एक विडंबन दिसत आहे .व त्यावर अनेक मान्यवर लोकांनी लेखाला उद्देशून प्रतिसाद दिले आहेत .पण माझ्या बाबतीत वेगळच मुद्दा आहे .
.
बिका ह्यांच्या तेंडूलकर ह्या लेखात मी चुकून उरफाटा प्रतिसाद दिला .
त्यावर तुम्ही मला खव करून त्यासंबंधी विचारले ,त्याला मी उत्तर दिले ( सभ्य भाषेत )

खुद्द बिका ह्यांनी माझ्या उरफाट्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष केले होते ( व त्याबद्दल मी वेळोवेळी दिलगीरी व्यक्त केली )
मग काहीही गरज नसताना ह्या निमित्ताने तुम्ही माझ्या विरुद्ध लिहिण्यासाठी व मला सल्ले /विनंती /इशारे देण्यासाठी अनेक मिपाकरांना खव मधून आमंत्रण दिले ( येथेच मस्तानीचा संधर्भ आला )ह्याच वेळेचा सदुपयोग आपले अर्धवट लेख .कथा पूर्ण करण्यासाठी केला असता तर ...

मग माझ्या प्रत्येक लेखनात व प्रतिसादात सातत्याने तुमच्या कंपूने मला टार्गेट केले

तुम्ही आता प्रतिसादात अत्यंत साळसूद पणे मिपावर पूर्वी निरोगी कंपूबाजी व्हायची व आता तुम्हाला काय एवढे गहजब करावासा वाटला अश्या भावनेतून लिहिले आहे .
) ह्यात सर्वात कळीचा प्रश्न असा आहे की खरच तुमची कंपूबाजी निकोप होती का ?
मृत्युंजय हे मिपावरील जुने जाणते मिपाकर. आपल्या दोघांच्या खव मध्ये त्यांचे सुसंवाद असतात ( तटस्थ मिपाकर )
त्यानी पहिल्या दुव्यात निखळ प्रतिसाद दिला आहे .मग येथे तुमच्या कंपूबाजी विरुद्ध ओकार्या........ असा प्रतिसाद का दिला?

.( सूड बुद्धीने एकाला सातत्याने टार्गेट करणे हे ह्यावेळच्या कंपू बाजीचे प्रमुख लक्षण होते .व त्यामुळे तुम्ही दिलेल्या दुवांच्या हून ही कंपूबाजी वेगळी ठरते ( येथे आलेल्या बहुसंख्य प्रतिसादावरून ते स्पष्ट दिसून येते )

सूड बुद्धीने वयक्तिक रीत्या एकाला टार्गेट करण्याचे अप्रतिम उदाहरण येथेच घडले .

चिंतामणी ह्यांनी कंपूबाजी विषयी येथे मत मांडले .
तुम्ही पुरावा देऊन सभ्य भाषेत त्यांचे म्हणणे खोडले .
मात्र शिल्पा ब व निळे ह्यांनी
त्यांनतर लगेच दोन तासात त्यांच्या कौलाची खिल्ली उडवारा प्रतिसाद दिला त्याला तुम्ही व निळे ह्यांनी अनुमोदन दिले .
) थोडक्यात आमच्या विरुद्ध लिहाल तर तुमचा मिपावर बाजार उठवू अशी गर्भित सूचना तुम्ही ह्या निम्मिताने मिपाकरांना दिली .

दुसरा दुवा हा पराशेठ चा आहे .( पण येथे त्याने एकाला कोणाला टार्गेट करावे म्हणून लिहिले नाही आहे .व लेखात थोडे चिमटे तर देव सारख्या मिपाकाराचे कौतुक केले आहे )

दुवा २ मध्ये सुद्धा प्रतिसाद देतांना एका व्यक्तीला अनेक मिपाकारानी टार्गेट करून लिखाण झाले नाही आहे .( जे झाले ते केवळ लेखाच्या अनुषंगाने झाले .)

एक प्रगल्भ मिपाकर ह्या प्रकारावर भाष्य करतांना म्हणाला तसे ''जेव्हा एखाद्याला सातत्याने टार्गेट केले जाते तेव्हा खरच माझ्या कडून वयक्तिक टीका झाल्या''

.( एरवी कंपूबाज सोडले तर इतर मिपा करांच्या लेखाला प्रतिसाद देतांना व खव मध्ये संवाद साधताना माझी वागणूक नम्र असते त्याला विक्षिप्त पणाचा परीस स्पर्श नसतो .( तुम्ही नुकतेच एका खव मध्ये लिहिले .तुम्हाला वाद व भांडणे करायला आवडतात .)

मला स्वतःहून तसे करायला आवडत नाही .( काही मिपाकरांच्या मते मी स्वताचे कोड कौतुक एवढे करतो .कोणाविषयी गरळ ओकायला माझ्याकडे वेळ नसतो .)
कंपूबाज लोक सोडले तर इतर मिपाकारांशी माझे वर्तन अत्यंत चांगले आहे .
भले देऊ कासेची लंगोटी ..... हे आमचे ब्रीद वाक्य आहे .
बाकी विक्षिप्त पणा ह्या गुण धर्माला वयाचे बंधन नाही .त्यामुळे मोठे व्हा असे लिहिण्याचे येथे प्रयोजन दिसत नाही .

अवांतर - शुची ह्यांच्या लेखावर व प्रतिसादावर जो प्रकार झाला त्या प्रकारच्या हिडीस व हिणकस व अनावश्यक कंपूबाजी चा लवलेश तुम्ही जे दोन दुवे दिले त्यात आढळला नाही .

ह्यात एका आईला आपल्या मुलीची काळजी वाटणे व त्यामुळे पोट तिडकीने आपल्या भावना मिपा ला आपले परिवारातील एक घटक म्हणून मांडणे
हा शुशी ह्यांचा उद्देश होता .त्यांच्या भावनांची खिल्ली उडवून विनोद निर्मिती करणे हे कुठल्या सभ्य प्रकारात मोडते ?

प्रास

अदिती यांनी दोन जुन्या (आणि तेव्हा इथला सदस्य नसल्याने) न वाचलेल्या चांगल्या लेखांचे दुवे दिल्याबद्दल त्यांचे शतशः आभार!

दोन्ही लेख वाचून निखळ करमणूक झाली. :-)

धिन्गाना

परदेश गमनाचा स्वताचा किस्सा टाकल्यास पाक्रु अळणि होइल आणि दुसर्याचा॑ टाकल्यास आम्बट होइल्,काय करावे को
णि मार्गद र्शन करेल का...य???????

टारझन

Hey dude , this is awesome . Really liked your PAKRU here my dearest . I will try this on this weekend oh ! wait wont be possible , I am attending marriage and will have food there . Sorry .. next weekend sure.

Anyways . Congrats .

~Taroba
I dont know what and how goes personal.

Nile

या पाकृत तिखट जास्त घातलं आहे का? फार झोंबलं हो! ;-)

कवितानागेश

पुढाल्या शणवारी अजुन एक द्वाड रेशीपी पायजेलाय. :(

-दणका

गणपा

रेसिपीतपण काही बदल केलेत का हो लंबुटांग?
वरुन दिलेल्या फोडणीतल्या मोहर्‍यांच प्रमाण निम्म्याहुन कमी झालेल दिसत आहेच. ;)

शिल्पा ब

रेशीपी बदललेली दिसतेय खरी.

शिल्पा ब

नाही, धागा मधेच अदृश्य झाला होता म्हणुन विचारलं काहीतरी बदल असावा..

@मागील लेखाच्या वेळी ज्यांनी मला 'हलके घ्या' असे सांगितले होते त्या लोकांचे अशा कंपूबाजीविषयी काय मत आणि भूमिका आहे, हे जाणून घेणे मला आवश्यक वाटते.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद

मिसाईल गायडेड आहे, असं दिसतंय. पण कळत नाहीये. हरकत नाही. थोडा अभ्यास करते अजून.

वपाडाव

नेहरासारखं शेवटच्या षटकात येउन का कळणार आहे....
आधी पाहुन तर घ्या अफ्रिकेला हरवायचंय का ऑस्ट्रेलियाला ?

स्पा

आता पुरे झालं लंबू टांग
तुमची लिहिण्याची हातोटी सुरेखच आहे, वादच नाही

पण आता काहीतरी सकस लिहा ना

एकाची मारायची ठरवली, कि मारतच सुटायचं का?
एकदा ठीक आहे, परत परत काय तेच ते...?

तुम्हाला नसेल पटत, तर हरकत नाही
कोणी कसे वागावे हे सांगण्याचा अधिकार मला नाही, एक निरीक्षण मात्र नोंदवले

अभिज्ञ

ह्म्म..
आता "जरा थांबा" सगळ्यांनीच....

:)

अभिज्ञ.

सविता

हो.... फार झाले. नवीन बकरा पकडा आता... एकाच माणसाला किती छळणार आहात?

आधीचे विडंबन मजेत होते.... हा धागा मुद्दामहून रॅगिंग करायला काढलाय हे स्पष्ट दिसतेय.

मस्करी ची कुस्करी नको. (मस्करी चालू होती तेव्हा पण ती कुस्करी सारखी घेतली गेली तो भाग अलहिदा!)

ह्या सर्व धाग्यांमध्ये शतकी प्रतिसाद मिळवण्याची शमता आहे .ह्यात वाद नाही .

उपरोल्लेखित 'ह्या सर्व' धाग्यांमध्ये एक धागा प्रस्तुत लेखकाचा (पक्षी: माझा) असल्यामुळे या धाग्यावरील (आणि या विषयावरील) आतापर्यंतचे मौन मोडून वरील प्रतिसादातील वादातीततेच्या दाव्याविषयीची असहमती (किंवा त्याविषयीची अनाकलनीयता) व्यक्त करण्याशिवाय प्रस्तुत लेखकास पर्याय उरलेला नाही.

प्रस्तुत लेखकाच्या धाग्यांचे किंचित निरीक्षण केले असता लक्षात येईल की 'जेम्स लेन' किंवा ठाकरे कुटुंब असा एखादा तत्कालीन किंवा कालातीत ज्वलंत किंवा जिव्हाळ्याचा विषय सोडता प्रस्तुत लेखकाच्या गरीब खाती शतकी प्रतिसादांचा धागा नाही. (ही तक्रार नाही; निव्वळ वस्तुस्थितीची कोरडी, किंबहुना निलाजरी जाण समजावी.) उपरोल्लेखित 'अंताजीची बखर'सारख्या धाग्यात ज्वलंत/जिव्हाळ्याचे तत्कालीन/कालातीत काही नसावे, अशी प्रस्तुत लेखकाची अटकळ आहे, त्यामुळे शतकी प्रतिसाद मिळवण्याची क्षमता (प्रस्तुत गरीब लेखकास चुकीच्या वाटलेल्या मूळ प्रतिसादातील शब्दाची दुरुस्ती केल्याबद्दल माफी असावी) त्या धाग्यात आहे, या उपरोल्लेखित प्रतिसादातील मताच्या वादातीततेशी प्रस्तुत गरीब लेखक सहमत नाही हे येथे नमूद करू इच्छितो. प्रस्तुत गरीब लेखकाने उपरोल्लेखित प्रतिसादाच्या घेतलेल्या शब्दशः अर्थाव्यक्तिरिक्त उपरोल्लेखित प्रतिसादाच्या लेखकास वेगळे काही म्हणावयाचे असल्यास (कारण तसे अनेकदा घडते असे दिसत राहते) ते 'वेगळे काही' प्रस्तुत गरीब वाचकास समजलेले नाही, याविषयी खात्री बाळगावी, ही विनंती. एवढे बोलून मी गरीब लेखक उपरोल्लेखित प्रतिसादकाची (आणि इतर वाचकांची) प्रस्तुत धाग्यापुरती (आणि विषयापुरती) रजा घेऊ इच्छितो.

प्रस्तुत प्रतिसादापायी कुणाच्या भावना वा उलून आलेली मने दुखावली गेली अथवा भडकली असल्यास प्रस्तुत गरीब लेखकाची चूक भूल द्यावी घ्यावी.
प्रणाम व लेखनसीमा.

सविता

उपरोल्लेखित प्रतिसाद डोक्यावरून दहा फूट गेला आहे.

-शंकासुर किंतू

वपाडाव

बागड्णारी, स्वच्छंदी सविता आता वैचारिक झाली आहे हे वाचुन ड्वले पाणावले...(प्रतिसाद वरुन जाण्यासाठीही वाचावा लागतो, ते सामर्थ्य आमच्यात नाही.)
-(फुन्सुक) बागडु

सविता

तू कोण रे बांगडू?

आणि मी कधी म्हणे तुला स्वच्छंदी बागडताना दिसले?

-(रँचो) सविता

वपाडाव

तुमच्या स्वाक्षरीतील ती GIF इमेज गायब झाली म्हणुन असं बोल्लो ....

सविता

ओह..... बॉर्र...बॉर्र.......

@प्रस्तुत गरीब लेखक सहमत नाही हे येथे नमूद करू इच्छितो. प्रस्तुत गरीब लेखकाने उपरोल्लेखित प्रतिसादाच्या घेतलेल्या शब्दशः अर्थाव्यक्तिरिक्त उपरोल्लेखित प्रतिसादाच्या लेखकास वेगळे काही म्हणावयाचे असल्यास (कारण तसे अनेकदा घडते असे दिसत राहते)
योग्य निरीक्षण मी १०० % सहमत

प्रतिसादाच्या लेखकाला गर्भिर्त अर्थाचे सांकेतिक भाषेत प्रतिसाद द्यायची सवय आहे .ते फक्त ज्या खास व्यक्तींसाठी असतात त्यांनाच उमजतात .
त्यामुळे गरीब लेखकाने योग्य निरीक्षण केले आहे .

प्रस्तुत प्रतिसाद हा निखळ मनाने दिला असून त्यांचा शब्दशः अर्थ घेण्यास काहीच हरकत नाही .
गरीब लेखकाच्या लेखावर वरील प्रतिसादाच्या लेखकाने मनात असून त्यावेळी प्रतिसाद द्यायचे टाळले .कारण त्यावेळी प्रतिसादाच्या लेखकाच्या भवती भाऊ गर्दी होती .
त्यामुळे त्या सुंदर लेखाचे उगाच अवांतर झाले असते .
वरील प्रतिसादाचा लेखक
मुक्काम पोस्ट....