Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फुलपाखरू माझ्या मनीचे....

ह — हर्षद प्रभुदेसाई, Sun, 03/27/2011 - 16:21
मन माझे जणू एक फुलपाखरूच होते.., असंख्य फुलांमधुनी..ते आपला मार्ग काढीतं होते । इतक्यात त्यातले एकच फ़ूल का.. त्यास इतके आवडिले, की त्या फुलावरी जाउनी मग ते.. विराजमान झाले । घेता गंध चाखता मध.. त्यास ते अपुलेसे वाटिले, आता विसावे इथेच आपण.. हे स्वप्न त्याने पाहिले । इतक्यात कुणीतरी येउनी फ़ूल ते.. तोडूनिया नेले, विसाविले पाखरू क्षणी त्या.. धरतीवर पडले । खाली पडता असे अचानक.. स्वप्न सारेते मोडूनी गेले, भान येता मग कळले त्यास.. फ़ूल आपुलेते कधीच नव्हते । हे सारे कळल्या वर मगते.. सैरा-वैरा उडू लागले, फुटल्या वाटी जाउनी तेथे.. त्याच फुलास ते शोधू लागले । वणवण फिरले शोधूनी थकले.. हताश होवोनी माघारी फिरले, फिरता मागे सोबत अपुल्या ते.. आठवणींना घेउनी आले । आठवणी त्या सुखद क्षणांच्या.. जिवापाड ते जपू लागले, देउनी बगल मग वास्तवास ते.. गेल्या क्षणांतच जगू लागले । ह्या साऱ्यातुनी हेच उमगले.. फुलावरी लाउनी जीव ते चुकले, जाता-जाता अखेर फ़ूल ते.. पाखराचा... जीवच घेउनी गेले... । हर्षद अ प्रभुदेसाई....

प्रतिक्रिया द्या
1659 वाचन

💬 प्रतिसाद (5)
P
pramanik Sun, 03/27/2011 - 18:14 नवीन
घेता गंध चाखता मध वा वा हे जाम कालजाला लागले.
  • Log in or register to post comments
क
काव्यवेडी Sun, 03/27/2011 - 18:28 नवीन
व्वा !!! सुन्दर कविता !! फूल आपुले कधीच नव्हते .................वेळीच कळले म्हणायचे !!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 03/28/2011 - 09:40 नवीन
साध्या सोप्या भाषेत आणि तरीही इतक्या सुंदरतेने कविता मांडली व्वा मस्तच !
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/28/2011 - 13:13 नवीन
फुलपाखरातुन प्रियकराची विरह व्यक्तीरेखा खुपच भिडणारा वाटला
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/29/2011 - 03:31 नवीन
छान...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा