Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भाकीत

द — दीपा माने, Sun, 03/27/2011 - 19:47
का असा लोपला हा चंद्र मेघडंबरी का शांत झाल्या अवखळ लाटा किनारी कुठे मंद पवन हळू गुप्त झाला का फुले पानाशी धरतात हा अबोला? दूर देऊळाची समाधी जणु लागलेली तिची शांतता पसरली ही आसमंती की भाकीतसे ह्या नीरव नीरव वेळी कालमानाचे गणित ते चंद्र्मौळी!

प्रतिक्रिया द्या
1541 वाचन

💬 प्रतिसाद (6)
स
स्पंदना Mon, 03/28/2011 - 03:50 नवीन
अहाहा! वाचताना आपोआपच कवितेतली शांतत्ता मनात भरत जाते. दिवसाची सुरुवात अशी करुन दिल्या बद्दल धन्यवाद दिपा!
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 03/28/2011 - 06:32 नवीन
छान झालीय कविता. शांत वातावरणनिर्मिती मस्तच!
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 03/28/2011 - 09:42 नवीन
व्वा मस्त छ्छोट्टीशी कविता :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/28/2011 - 13:10 नवीन
कविता छान .. मेघडंबरी आणि चंद्रमौळी नविनच शब्द आहेत माझ्या साठी .. प्लीज अर्थ सांगताल का ? मेघडंबरी म्हणजे मी वाचताना उगाच मेघअंबरी घेतले ..
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Tue, 03/29/2011 - 04:41 नवीन
aparna akshay, पैसा, कच्ची कैरी, गणेशा कविता आवडल्याबद्दल आभारी आहे. गणेशा, मेघडंबरी म्हणजे ढगांचे छत्र आणि चंद्रमौळी हे शंकराचे नाव आहे.
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप Tue, 03/29/2011 - 07:04 नवीन
मस्त कवोता... शांत भाव निर्माण झाला...छान...!!! अवांतर : रायगडावर पण महाराजांच्या डोक्यावर जे छत्र आहे तीला मेघडंबरी म्हणतात ना??
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा