Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयुष्य साधेपणे जगत गेला ...!!

प — प्रकाश१११, Mon, 03/28/2011 - 02:57
तो आयुष्य अगदी साधेपणे जगत गेला उगाच खर्च नको म्हणून नुसता काटकसरीने जगला स्वताच्या पोटाला चिमटा घेत ह्याचे त्याचे करीत गेलां मध्यम वर्गातला असा शिक्का स्वताच मारून घेतला शेव-पुरी पाणी पुरी घरीच करून खायचे काटकसर करून करून आयुष्य जगायचे लग्न झाले बायको पण साधी सुधी मिळाली हनिमूनला न जाता घरीच गात बसली डोहाळे डोहाळे लागले फक्त चिंचा खाण्याचे स्वप्न त्याना कधी पडायचे एकादशीचे खरे म्हणजे बर्यापैकी पगार होता त्याचा पगार झाला म्हणजे घरी पेढे आणायचा देवापुढे ठेऊन घरी प्रसाद वाटायचा कधीतरी चार आण्याचा गजरा आणायचा नवरा मात्र उदार असे वाटून ती सुखावून जायची चालण्यासारखा व्यायाम नाही, असे दोघे म्हणायची भर उन्हात सुद्धा दोघे चालत घरी यायचे थंड थंड माठ्तले पाणी पिऊन दोघे तृप्त व्हायचे काळ गेला वेळ गेली , कळले देखील नाही वय झाले कसे गेले कळले सुद्धा नाही एके दिशी छातीत कळ नि अचानक तो गेला घरासाठी मात्र खूप ठेऊन काही गेला तो आयुष्य अगदी साधेपणे जगत गेला उगाच खर्च नको म्हणून नुसता काटकसरीने जगला

प्रतिक्रिया द्या
1741 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ह
हरिप्रिया_ Mon, 03/28/2011 - 07:28 नवीन
:(
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 03/28/2011 - 07:30 नवीन
व्व्व्वा वा छान लिहिलिय :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 03/28/2011 - 07:49 नवीन
खूप छान! मागच्या पिढीतल्या कित्येक निम्नमध्यमवर्गीय जोडप्यांची कथा सांगणारी कविता आवडली!
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Mon, 03/28/2011 - 07:58 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अशोक७०७ Mon, 03/28/2011 - 08:19 नवीन
मस्त रचना, आवडली
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 03/28/2011 - 09:49 नवीन
कविता बोधपूर्ण आहे ,यातुन हे कळते कि आयुष्य इतके मरमर करत काढण्यापेक्षा आयुष्य जगायचे आणि फुलवायचे . कवितेतल्या नायकाला बायको साधी सुधी मिळाली नसती तर बरे झाले असते ,अशी एखादी कविता येऊ द्या अजुन :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/28/2011 - 13:08 नवीन
नेहमी पेक्शा वेगळी शब्दरचना .. जास्त उच्च नाही नेहमीप्रमाणे .. परंतु सत्य कथा वाटत आहे .. त्यामुळे त्याला शब्दांच्या झालरी पेक्षा ही खरे पणाची किणार वाटते आहे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/29/2011 - 03:35 नवीन
अप्रतिम...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा