पाककृती

सांडग्याची भाजी----

Primary tabs

Image removed. साहित्य - एक वाटी सांडगे, एक कांदा, कोथिम्बीर,फोडणीचे साहित्य, तेल.मीठ, मसाला. कॄती-- प्रथम थोड्या तेलावर सांडगे भाजुन घ्यावे, बाजुला काढून ठेवावेत,कांदा बारीक चिरुन घ्यावा, जरा जास्त तेल घालून खमंग फोडणी करा(मोहरी,जिरे, हिंग, हळद), त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत परतुन घ्या, त्यात कांदा-लसुण मसाला किंवा काळा मसाला एक चमचा टाका त्यात बाजुला भाजुन ठेवलेले सांडागे घाला, पुन्हा परतुन घ्या.चविनुसार मिठ घाला, गॅस बारीक करुन त्यावर झाकण ठेवा, त्यात थोडेसे पाणी घाला, थोड्यावेळाने ते गरम पाणी भाजीत घाला, चांगली शिजु द्या,(वाटल्यास थोडेसेच शेंगदाणे कुट घाला). गरमागरम खमंग सांडगे भाजी तयार. ही भाजी चपाती, भाकरी, रोटी कशाबरोबरही छान लागते.
पिंगू

वाह. सांडग्याची भाजी चवीला अप्रतिम लागते.

- पिंगू

टारझन

लहाणपणी मी जेंव्हा बर्‍हाणपुर ला माझ्या आत्या कडे गेलो होतो तेंव्हा तिने रोज सांडग्यांची भाजी करुन विट आणला होता. त्या बर्‍हानपुर दौर्‍यानंतर आईची नी माझी सांडगे खाण्याची इच्छाच मेली .आईने जेंव्हा आत्या आमच्याकडे आली तेंव्हा तिला पंचपक्वान्नांचा पाहुणचार केला होता. बदल्यात अशी सांडग्यांचा पाहुणचार भेटलेला पाहुन आई आणि मी बराच हर्ट झालो होतो. त्यानंतर् आम्ही पुन्हा कधी आत्या कडे गेलो नाही. परंतु तो दौरा माझ्या मनावर एक खुण सोडुन गेला जी आजन्म कायम राहिन .

त्यापुर्वी मात्र मला सांडगे आवडत असावेत असे पुसटसे आठवते आहे.

-(इतिहासात रमलेला) सांडगाराम

पियुशा

फोटो बद्द्ल काहि नाहि म्हनालास आज?

टारझन

हो ते राहिलंच .. निवेदिता ताई छाण दिसत आहेत फोटु मधल्या हिरव्या साडीत.

धन्यवाद .

एसिपी ने कहा कौन है कोंकण का शेहेंशा ..
एसीपी ने कहा कौन है कोकण का शेहेंशा ..
दया बोला ये तो है टार्‍या ,फिर कौन कैरी कोन पियुशा

- (सांडगा प्रेमी ) सांड गा

गवि

पाकृ आवडली. फक्त एकच जाणून घ्यायचंय..

इथे उल्लेख केलेले सांडगे म्हणजे नेमके कसले ?

मिरचीचे आणि इतर अनेक वाळवलेल्या प्रकारांना सांडगे म्हणतात ना?

मेघवेडा

इथे उल्लेख केलेले सांडगे म्हणजे नेमके कसले ?

मिरचीचे आणि इतर अनेक वाळवलेल्या प्रकारांना सांडगे म्हणतात ना?

असेच विचारतो.

इथे केलेल्या सांडग्यातील घटक-- मटकीडाळ, हरबरा डाळ, लाल तिखट, मिठ, जिरे,हिंग, लसुण इ.इ.

प्यारे१

सांड्ग्यात अंडं नसतं काय...???

कच्ची कैरी

<एसिपी ने कहा कौन है कोंकण का शेहेंशा ..
एसीपी ने कहा कौन है कोकण का शेहेंशा ..
दया बोला ये तो है टार्‍या ,फिर कौन कैरी कोन पियुशा
काय खानदेशातुन सरळ कोकणात पोहचलास ?कसला दलबदलु आहेस ?आणि ही कैरी कौन ?
-सतरंगी गिरगीट
बाकी निवेदिता ताई तुमच्या रेसेपीजचे फोटो इतके पुसट का असतात ?त्यामुळे रेसेपीची मजा येत नाही ,बाकी रेसेपी छान असावी असा अंदाज आहे

प्राजु

हेच म्हणते... फोटो खूप ब्लर्र आहे.. लख्ख प्रकशात फोटो काढला असता तर काही वेगळीच मजा आली असती.
(कुंद्याच्या भुर्जीला सुद्धा हाच प्रतिसाद दायचा होता..)

रेवती

येस्स! फोटूत सुधारणा आवश्यक!
मी अश्याच पद्ध्तीने ही भाजी करते पण सांडग्यात मीठ असते हे विसरून जवळजवळ १०० % वेळेस भाजीच्या प्रमाणात मीठ घालते. मग त्यात कच्चा बटाटा घालून ठेवावा लागतो.;)

स्पंदना

कच्चा बटाटा?

मी कोळसा घालते. तेव्हढ्या साठी दोन किलो कोळसे काय्म घरात असतात्च.

निवेदिता ताई 'सांडगे छान च' आम्ही कोल्हापुर भागात तुर डाळीचे सांडगे करतो. छान लागतात.

पैसा

भाजी सांडग्यांची का मिठाची? ;)
आम्ही सांडग्यांची रस्साभाजी करतो, भाजलेल्या कांदा खोबर्‍याचं वाटण घालून.