Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मज्जा आहे बुआ ....

व — विश्वेश, Tue, 03/29/2011 - 06:11
माझ्या मुलाची एक मैत्रीण आहे खास, एका कामवाल्या बाईची गरिबाघरची पोर आहे ... दोघांचे छान जुळते . मला नेहमी वाटायचे कि काय बोलत असतील हे एकमेकांशी ? ह्या कविते मधून ते काहीसे मांडायचा प्रयत्न .... gas वरील मऊ मऊ तूप पोळी भरवते तुला आई ... माझ्या मात्र नाकातोंडात सतत चुलीचा धुआ एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ .... झोपतोस तू शांतपणे लाऊन गुड नाईट कि काय आम्ही मात्र पुरवतो महिनाभर तुकड्या तुकड्याने कछुआ एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ .... फिरत असते मी एकटीच दिवसभर स्वताशीच खेळत तुझ्या मागे असतो ताफा आजी आबा मौस्या अन बुआ एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ .... कित्येकदा असते आजारी अन अनवाणी कोणाला काय त्याचे सुटाबुटात ठेच लागली तरी जग विचारते तुला क्या हुआ क्या हुआ ? एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ .... आमच्या कडे कायमच काळोख त्याची कसली रे तुला भीती ? मला तर त्यात सापडते माझी परी तुला मात्र दिसतो बुवा ... एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ .... उष्टे, उरले, नासले भर भरून दिलेस मला ... मी पण गोड मानले अन नेहमीच दिली तुला दुआ एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ .... मी अशी टाकलेली सोडलेली वार्यावर जगायला ... तू असा आंजरलेला गोन्जारलेला आपल्यात कसा जुळणार दुवा एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ .... एका मुलाची काय भलतीच मज्जा आहे बुआ ....

प्रतिक्रिया द्या
1709 वाचन

💬 प्रतिसाद (3)
स
स्पंदना Tue, 03/29/2011 - 06:26 नवीन
छान विश्वेश!! बराच वेगळा विचार अन वेगळ्या धर्तीची आहे कविता . काही काही ओळी खुप काही सांगुन गेल्या, जस की>मला तर त्यात सापडते माझी परी तुला मात्र दिसतो बुवा ...> ही एक ओळ. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_ Tue, 03/29/2011 - 06:33 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/29/2011 - 11:44 नवीन
छान लिहिले आहे ...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा