पाककृती
मेथीचे धिरडे
Primary tabs
साहित्यः
१ कप बारीक चिरलेली मेथी
१ कप तांदुळाचे पीठ
१ टीस्पून लसूण पेस्ट
१ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
१ टीस्पून जीरे पावडर किंवा जीरे
मीठ चवीप्रमाणे
तेल
पाकृ:
एका पॅनमध्ये थोड्या तेलावर मेथी परतून घ्यावी.
बाकीचे साहित्य आणी परतलेली मेथी सगळे नीट एकत्र करणे.
धिरडे/डोश्याच्या पीठाप्रमाणे पीठ पातळ तयार करणे.
नोन्-स्टीक तवा तापवून थोडे तेल घालणे.
डावाने धिरडे घालून गॅस मंद करून झाकण ठेवावे.
झाकण काढून , धिरडे उलटून दुसर्या बाजूने शिजवावे.
चटणी, सॉस सोबत खायला देणे.

पाकृ छान आहे. मी यात आलं व थोडे डाळीचे पीठही (बेसन) घालते एवढाच फरक.
फोटू चांगला आलाय. मेथी परतून घेतल्याने काय फरक पडत असेल असे तुम्हाला वाटते?:)
कारण मी कच्ची (बारीक चिरून) मेथी वापरते.
सुंदर.............परतल्यामुळे चव वेगळी लागणार
............फोटु मस्त....
चटणी कशाची आहे??
अगदी बरोबर निवेदिता-ताई मेथी परतल्यामुळे स्वाद छान लागतो :)
चटणी लसणाची आहे :)
@ ५० फक्त
मि.पा वर पाकृ फोटोसकट टाकायची तर थोडा सयंम ठेवावाच लागतो :)
आभार प्रतिसादाबद्दल
पाक्रु पण भारी अन फोटोतली रंगसंगती पण. हे असलं खायला करायचं अन एवढा छान फोटो काढे पर्यंत थांबायचं एवढी वाट पाहु शकत नाही आपण. मानलं तुम्हाला.
झकास पाकृ!
यात कोणतीही भाजी छान लागते. अगदी गाजर, दूधी भोपळा वगैरे भाज्या खिसून घातल्या तरी मस्त लागतात.
मी यात थोडे कॉर्न मील घालते... त्याने एकप्रकारचा क्रिस्पीनेस येतो.
संयमी पाककृती सानिकाताय. ही करताना पण संयम ठेवायला लागतो, नाहीतर बिघडते स्वानुभवावरुन..
- (चवीने खाणारा आणि संयमाने बनवणारा) पिंगू
लसणाच्या चटणीत सायीचे दही घालून खा..धिरडी अजुन छान लागतिल.
पाकृ छान आहे...
धन्यवाद !!