Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भिऊ नकोस ...

व — विश्वेश, Wed, 03/30/2011 - 06:44
स्वतापुरते लढायचे बळ तेवढे आता गाठीशी आहे ... आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..." तुझ्या ह्या आश्वासनाने केले होते भितीना दफन ... अन उभा ठाकलो लढाया जगाशी बांधून डोईवर कफन माहित नव्हते माझी लढाई नशिबाच्या काठीशी आहे .... आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..." लढलो अनेक समरे काही जिंकलो काही हरलो लढता लढता लोटली वर्षे, परंतु मागे नाही फिरलो ... हरलो शेवटी वयाकडून, माहित नव्हते गाठ साठीशी आहे ... आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..." गळाले सगळे बळ, अन गळाल्या सगळ्या आशा आलास समोरून चालत अन दिलास पुन्हा दिलासा ... दाखवलास मज आरसा माझ्याच भूतकाळाचा दिसला त्यात चेहरा मज एक निरागस बाळाचा ... दाखवून मलाच माझे बिंब म्हणालास "कोण तू होतास ... अन काय तू झालास" उभ्या जीवनाचा अनुभव तुझ्या गाठीशी आहे .... अन म्हणालास "भिऊ नकोस .... तू माझ्या पाठीशी आहे"

प्रतिक्रिया द्या
1335 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
महेश काळे Wed, 03/30/2011 - 10:03 नवीन
धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR Wed, 03/30/2011 - 10:07 नवीन
सुंदर कविता
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 03/31/2011 - 07:18 नवीन
छान! आवडली कविता! यावरून मलाही एक सुचली ती टाकतोय.
  • Log in or register to post comments
S
sneharani गुरुवार, 03/31/2011 - 07:23 नवीन
मस्त कविता!
  • Log in or register to post comments
न
नारयन लेले गुरुवार, 03/31/2011 - 09:25 नवीन
मनाला भावली. मस्तच व जेश्ट नागरिकानच्या आठ्वणी जाग्या करायला लवणारि कविता वाटली . विनित
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा