पाककृती

नववर्षाच स्वागत !कडुलिंब!!

Primary tabs

Image removed.Image removed.From नुकतेच आजच्या शुभ दिना बद्दल लिहिलेले शुभेच्छा पर दोन लेख वाचले. एका ठिकाणी प्रतिसादात कडुनिंबाचा उल्लेख वाचला अन जरा बर वाटल मंडळी. तर कडुनिंब! सुरु होणाऱ्या दाहक उन्हाळ्याचे दुष्परिणाम हारक! औषधी ! आजच्या दिवशी याच सेवन करुन आपण याच औषधी महात्म्यच जणु अधोरेखित करतो दरवर्षी. विसरल्या पासरल्यां साठी, अन नवनवीन गोष्टींच्या प्रभावात न शिकलेल्यांसाठी ही कडुनिम्ब बनवायची सोपी अन परंपरागत पद्धती. साहित्य:- अर्थात कडुनिंबाची कोवळी पाने. आमच्या गावी बाळ लिंबाऱ्याची खातात, यालाच गोडा लिंब पण म्हणतात. पण येथे मी जर असल काही मागितल बाजारात तर माणस झिट येवुन पडायची. त्यामुळे मी आपला मिळाला तो त्यातल्या त्यात बरा कडुलिंब गपचुप आणला. तिथेच तो माणुस कडुलिंबाचा फुलोरा ही विकत होता, म्हणुन घरी शेंडे मिसळताना त्यात फ़ुलेही मिसळलेली असल्याची आठवण येउन मी तो ही विकत घेतला. तर कडुलिंबाची साधारण कोवळी पाने एक अर्धी वाटी, वा पन्नासभर. मोजुन चार काळेमिरे. अर्धा चमचा जिरे. चिमुटभर (चवी साठी नव्हे, चिमुटभर म्हणजे चिमुटभरच) मिठ. चिमुटभर हिंग. थोडासा गुळ. एक दोन चमचे भिजवलेली हरभर्‍याची डाळ.(भिजाणे) कच्ची कैरी. साधारण एक चमचा भर किसुन. Image removed.Image removed.From कृती:-मिरे अगदी हळुवार ठेचुन घ्या. अगदी हलक्या हाताने जास्त बारीक न करता साधारण चुरा करुन घ्या. जीरे ही असेच हलके ठेचुन घ्या. अगदी याच हलक्या हाताने भिजवलेली हरभर्‍याची डाळ सुद्धा ठेचुन घ्या. कडुलिंबाची पाने हाताने बारीक बारीक तोडत त्यात गुळ, मिठ, हिंग, मिरे अन जीरे अन भिजाणे मिसळत जा. वरुन किसलेला कैरीचा किस मिसळा. Image removed.Image removed.From आता हा तयार झालेला लिंब पहिला देवाला, गुढीला दाखवा, अन मग घरातल्या मोठ्यांना नमस्कार करुन अन लहानांना आशिर्वाद देत साऱ्यांना वाटा. स्वत: ही खायला विसरु नका बर! नुतन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धीचे अन आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! __/\__ अपर्णा
पक्का इडियट

>>>>आता हा तयार झालेला लिंब पहिला देवाला, गुढीला दाखवा, अन मग घरातल्या मोठ्यांना नमस्कार करुन अन लहानांना आशिर्वाद देत साऱ्यांना वाटा. स्वत: ही खायला विसरु नका बर!

मोठ्यांना नमस्कार करणे ह्या तद्दन कालबाह्य प्रथेचे समर्थन करणारे वाक्य त्वरित संपादित व्हावे.

धन्यवाद.

गणपा

आमच्या घरी असला पदार्थ वगैरे बनवुन लाड नाही करायचे. गप गुमान पानं खावी लागायची लहान असताना. :) आणि मग त्यावर उतारा म्हणुन मग श्रीखंड मिळे.

जेव्हा चौथीत असताना कांजीण्या आल्या होत्या तेव्हा तर त्या कडुनिंबाच्या पाल्यावर झोपवण, कडुनिंबाच्या पाण्याने आंघोळ करण, काढा पीणं.... जाउदे नकोच त्या आठवणी.

स्पंदना

लाड? गणपा भौ! जन्मल्या पासन दर वर्षी ह्येच खाव लागतय आम्हाला.

मला पण आठवतय मला लिंबाच्या पाण्यान अंघोळ घातलेली. छान अस्तो हो लिंब. मी सांगितलाय तसा करुन बघा, दोनदा खाल

आमच्या घरी असला पदार्थ वगैरे बनवुन लाड नाही करायचे.
गप गुमान पानं खावी लागायची लहान असताना.

आम्हालाही....लिंबाची पाने आणी गुळ(थोडासा) मिळे त्याच्याबरोबर...
आता मी ही हेच देते घरात सर्वांना...आणी त्यावेळी बाहेरचे कोणी आले तर त्यालाही!!!!!!

सुहास..

मस्त अपर्णा ताई !!

नववर्षाच स्वागत आणि पाडव्याच्या दणदणीत शुभेच्छा !!

अनामिक

आमच्याकडे कडूलिंबाचा फुलोरा घालून पन्हे करतात पाडव्याला. हि वरची पाकृ त्यापेक्षा चांगली वाटतेय.

आण्णा हजारे उपोशणास बसले आहेत त्या मुळे पाकक्रुतिचे धागे टाकावेत का?

सुधीर१३७

कडुनिंबाचे टाकण्यास हरकत नाही..................... :wink: