(एका तळ्यात होती)
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते अतिशहाणे पिल्लू तयात एक
घेताच कोणी त्याला खेळावयास संगे
सर्वाहुनी निराळे बळेच ते तरंगे
दावूनी बोट त्याला म्हणती खजिल लोक
आहे अतिशहाणे पिल्लू तळ्यात एक
पिल्लास माज भारी खुळे म्हणे सर्वांसी
पाखंड अविचारी सांगेल ते जनांसी
जो जो तयास टोची दावी उगाच धाक
होते अतिशहाणे पिल्लू तळ्यात एक
एके दिनी परंतु पिल्लास ना कळाले
ढापीव ज्ञान त्याचे डबक्यामध्ये बुडाले
घाणीत डुंबताना जन्मांतरी कित्येक
कधी न त्या कळाले तो मंडूकच एक
💬 प्रतिसाद
(31)
न
निनाव
Mon, 04/04/2011 - 19:47
नवीन
भन्नाट. अस्त्र-शस्त्र-सर्वत्र !!
पाड्व्या च्या दिवशी - बेगॉन चा मारा करू नका हो :).
कविता खूपच सुंदर. (थोडी गम्म्त केली बर का..राग मानून घेउ नका..)
आपणांसः गुढीपाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. :)
- आपला
निनाव.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 04/04/2011 - 20:02
नवीन
:)
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Tue, 04/05/2011 - 09:00
नवीन
:)
हीही
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 04/05/2011 - 10:54
नवीन
छान
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 04/05/2011 - 10:59
नवीन
_/\_
आमचा प्रणाम स्विकार व्हावा गुरुवर्य! :)
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 04/05/2011 - 20:12
नवीन
मस्तच आहे!
काव्याचे स्फुर्तिस्थान कुठे आहे? ;)
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Wed, 04/06/2011 - 07:36
नवीन
__/\__.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Mon, 03/05/2012 - 09:32
नवीन
एका दगडात अनेक बदके! :D
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 03/05/2012 - 10:46
नवीन
बदके, बेडके सर्वच !! :D
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Mon, 03/05/2012 - 10:50
नवीन
ही वाचायची कशी राहून गेली? भन्नाट लिहिली आहे. प्रेरणा नक्की कुठे मिळाली? (अर्थातच मूळ कवितेबद्दल बोलत नाहीये)
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Mon, 03/05/2012 - 16:51
नवीन
(सहज लिहीता लिहीता सुचलेले विडंबन आहे. त्यामागची प्रेरणा नक्की कुठे मिळाली हे सांगता येणे अवघड आहे.)
- Log in or register to post comments
र
राघव
Mon, 03/05/2012 - 11:46
नवीन
मस्त!!
- Log in or register to post comments
अ
अक्षया
Tue, 08/28/2012 - 14:06
नवीन
अतिशय छान लिहीले आहे विडंबन.
अतिशहाण्या बदकांनी कॄपया राग मानु नये..:)
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Tue, 08/28/2012 - 17:33
नवीन
अशी किती अतिशहाणी बदके आहेत तळ्यात?. कविला तर एकच दिसत आहे ! की काही अतिशहाणी यापूर्वीच मंडूकात रूपां तरित झालेली आहेत.?बरं विडंबनाची प्रेरणा खुल्ला सांगायला काय हरकत आहे?
मिपावर भरपूर विटंबन क्षमा करा विडंबनकार भरपूर आहेत ! त्यानाही सुचेल काहीतरी !
- Log in or register to post comments
त
तिमा
Tue, 08/28/2012 - 17:43
नवीन
बरीचशी दुसर्या तळ्यात, आय मीन समुद्रात, गेली आहेत. त्यामुळे आता एकच दिसत आहे.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Tue, 08/28/2012 - 17:46
नवीन
समुद्रात गेली म्हणजे रत्ने , शंख शिपले, प्रवाळ, सोनेरी वाळू, मोठे मासे, ... आयला त्यांची प्रगतीच झाली म्हणायची का काय ?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 05/27/2013 - 13:57
नवीन
वाह वाह!
कसं काय सुचतं ब्वा लोकांना. ;)
मूकवाचकाला एक प्यार्टी लागू.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Mon, 05/27/2013 - 14:52
नवीन
तेंव्हा नुसता नमस्कार घातला होता, आता मात्र दंडवत घालेन म्हणते.

- Log in or register to post comments
इ
इनिगोय
Mon, 05/27/2013 - 15:55
नवीन
मुवांचा द्रष्टेपणा आणि बदकाची कन्सिस्टन्सी.. दोन्हीपुढे.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 05/27/2013 - 17:04
नवीन
तळं तेच असतं. बदकं बदलत असतात.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sat, 07/27/2013 - 11:01
नवीन
लोंढ्यात वाहुन गेलेली ही कविता वाचायचीच राहिली होती.
सध्या तळ्यात असलेली शांतता ही वादळापूर्वीची तर नाही ना?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 07/27/2013 - 11:58
नवीन
वाचायचीच राहिली होती ही कविता!
मस्त!
>ढापीव ज्ञान त्याचे >> =))
- Log in or register to post comments
आ
आशु जोग
Sat, 07/27/2013 - 13:59
नवीन
हीट्ट धागा २ वर्षे सुरु आहे
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sat, 07/27/2013 - 14:10
नवीन
Evergreen!! :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sat, 07/27/2013 - 14:17
नवीन
बदलत्या काळातही तितकीच लागू पडणारी कविता !!!!!!! मूवाशेठ, दंडवताचा स्वीकार करणेत यावा _/\_
- Log in or register to post comments
ह
होकाका
Mon, 07/29/2013 - 05:32
नवीन
खूपच सुंदर!
ही कविता आधी कधी वाचण्यात आली नव्हती. अगदी अलगदपणे केलेले विडंबन आहे. मला वाटतं, आजच्या स्पर्धेच्या काळात, प्रत्येक मुलावर नकळत एकमेकांशी स्पर्धा करण्याचे चुकीचे संस्कार होत असतात आणि त्यातूनच अशी टोकाची 'मी'पणाची भावना आणि स्वत:बद्दलची फाजील समजूत दॄढ होत जाते. विशेषकरून मुलग्यांमध्ये ही स्पर्धेची tendency खूप दिसते.
पुन्हा एकदा, सुंदर काव्य!
- Log in or register to post comments
स
स्पा
Mon, 07/29/2013 - 05:56
नवीन
अरे वा
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Mon, 07/29/2013 - 07:14
नवीन
कोणत्याही परिस्थितीत, सगळीकडे लागू पडेल अशी 'सार्वकालिक' कविता :-)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 07/29/2013 - 08:24
नवीन
मस्त !
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 08/02/2013 - 15:47
नवीन
- Log in or register to post comments
स
सार्थबोध
Mon, 08/05/2013 - 12:11
नवीन
छान
- Log in or register to post comments