Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना

प — पाषाणभेद, Tue, 04/05/2011 - 20:25
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना

मामा अहो मामा, तुमच्या पोरीला काय समजवाना फोन केला तर म्हनती, व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||धृ|| कालच आणला मोबाईल नवा मार्केटमधी लई त्याची हवा वाटतंय तिनं एकदा तो पहावा पण तिची भेटच होत नाहीना! फोन केला तर म्हनती व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||१|| आता सगळं कसं सांगू तुमाला मोबाईलचा हायटेक जमाना आला तिला सारं काही समजते रोजरोज एसऐमएस पाठवते पर व्हायब्रेटर ही काही रिंगटोन नाहीना! फोन केला तर म्हनती व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||२|| मी म्हनलं आपण एकदा भेटूका? मोबाईलचं टेकनीक समजून देवूका? तुझ्या हातात माझा मोबाईल देतो एकएक मेनूचा डेमो देतो पन असली चेष्टा बरी नाहीना! फोन केला तर म्हनती व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०५/०४/२०११

प्रतिक्रिया द्या
3429 वाचन

💬 प्रतिसाद (13)
न
निशदे Tue, 04/05/2011 - 22:35 नवीन
जबरदस्त..........यापुढे शब्दच नाहीत प्रतिक्रियेसाठी......
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Wed, 04/06/2011 - 04:08 नवीन
वॉव
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 04/06/2011 - 07:34 नवीन
हाअ!! हा! पाभे!! एकदम हायटेक प्रकरण दिसतय!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 04/06/2011 - 12:37 नवीन
मस्त एकदम .. दादा कोंडकेच आठवले लास्टच्या कडव्यामुळे .. झक्कास लिहिले आहे ..
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 04/06/2011 - 12:51 नवीन
हा हा हा भारी ! साला ह्या पाभेंच्या सगळ्या कवितांची एक पिडिएफ बनवुन शिंदे बंधुंना नेऊन देणार आहे मी :)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा कांबळे Wed, 04/06/2011 - 14:40 नवीन
लय भारी......
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 04/06/2011 - 14:44 नवीन
हाण्ण तिच्यायला! पाडव्याच्या म्हुर्ताला तिकडं नारायनगावात फडांची म्हुर्ताची सुपारी निगाली आन हिकडं आमचं शाहीर दन्नादन्ना दनकंबाज लावणी लिव्हायला लागलं नव्हं का?
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 04/07/2011 - 01:39 नवीन
हाण हाण !!! पराशेटशी सहमत आहे .. विठ्ठल शिंदेंना खंप्लीट कलेक्शन देउयात !! चामायला देवकाका चाल लाउन द्या हो जरा !!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/07/2011 - 05:20 नवीन
ख्या ख्या ख्या...खी खी खी... दफोरावांनी मोबील चार्ज केलेला दिसतोय यकदम !!! ;) बाकी या वरुन मला हे खालचं गाणं आठवलं... ;) http://www.youtube.com/watch?v=2kRanuGMZr0&feature=related
  • Log in or register to post comments
ई
ईश आपटे गुरुवार, 04/07/2011 - 07:01 नवीन
विनोद किती जणाना कळलाय............शंका आहे............ :)
  • Log in or register to post comments
अ
असुर गुरुवार, 04/07/2011 - 10:49 नवीन
तुम्हाला समजला का विनोद? समजला नसेल तर विशेष आश्चर्य नाही. समजला असं वाटत असेल तर राहूद्या ना तुमच्याकडेच! तुम्ही रसग्रहण करणार का या कवितेचं?? रसग्रहण करणार असाल तर प्रश्नच नाही. येलकम! बिचारे असमंजस मिपाकर ज्ञावृद्धीसाठी तुमचे ऋणीच राहतील. आणि करणार नसाल तर बाकीच्यांची उगाच काळजी कशाला ? पाभे, भारी कविता!! :-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे
स
सुहास.. गुरुवार, 04/07/2011 - 12:07 नवीन
सच्या, मस्त रे !!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 04/08/2011 - 06:12 नवीन
लईच भारी हाय ब्वॉ व्हायब्रेटर! कुठ कुठ यीन काय कळानी ब्वॉ!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा