Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<पेयनिष्ठ पेताडाचा कर्मदरिद्री बाटलीभंग>

ल — लंबूटांग, गुरुवार, 04/07/2011 - 16:33
प्रेरणा बसे उकिडवा बाटली उघडून चखणा खातो कर्रम कुर्रम प्रचंडकुंथी वायूप्रदूषण धडाम धुडूम्म धडाम धुडूम्म शेव न चकली उडतो फन्ना पेला भरीतो आणिक एक आता जगाची सोडून चिंता फाड फाडतो इंग्लिश भेदक ग्लेन्मोरेन्जी यथेच्च ढोसून निरर्थ काही बर बर बरळीत शिग्रेट बीडी ओढून ओढून वूक्खु विक्खी खोकत खोकत खरडत खुरडत सावरि धोत्रा त्रेधा तिरपिट विचित्र मुद्रा बाथरूमचा कडाकोयंडा जाईजाईस्तो घडे अभद्रा आकाशातील सप्तढगावर ह्याला फाट्यावर त्याला फाट्यावर मग खंबा तो संपेस्तोवर टांगा पलटी घोडे फरार Disclaimer: मूळ कवितेप्रमाणे एकमेकांशी संबंध नसलेली कडवी लिहीण्याइतकी माझी दांडगी प्रतिभा नाही.

प्रतिक्रिया द्या
5208 वाचन

💬 प्रतिसाद (22)
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 04/07/2011 - 16:38 नवीन
यकदा टाकली आख्ख जग.. मधे जातं. असो (आता उरलो शास्त्रापुरता)
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 04/07/2011 - 16:40 नवीन
हा हा हा मस्त रे लंबु.
  • Log in or register to post comments
न
नंदू गुरुवार, 04/07/2011 - 16:43 नवीन
तैंच्या कवितेच्या विडंबनाचं शिवधनुष्य तुम्ही चांगलंच पेललंय. मिपा ला एक नविन विडंबनकार मिळाला तर! जियो....
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 04/07/2011 - 16:47 नवीन
शेवटच्या कडव्यापर्यंत दारूचा असर व्यवस्थित झालेला दिसत आहे! मान गये ग्रु! बौ वधिया! मूळ कवितेइतकीच जब्बर आहे!
  • Log in or register to post comments
स
सुहास.. गुरुवार, 04/07/2011 - 16:48 नवीन
लंबिदिनी ...आपल हे...लंबुटांग.... ;) मस्त रे !! शेव न चकली उडतो फन्ना पेला भरीतो आणिक एक आता जगाची सोडून चिंता फाड फाडतो इंग्लिश भेदक >>> क्षमस्व , या कडव्यात आपल्या एका मित्रा ची आठवण कशी झाली नाही ?? घोडे फरार , हले डुले आणि ...बरेच काही असलेला
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/07/2011 - 16:58 नवीन
"लंबूटांग(णी) भयंकर", तुमची नवी कविता मूळ कवितेप्रमाणेच अद्भुत आहे! आता एका कडव्याचा दुसर्‍याशी संबंध नसलेली कविता कशी 'पाडावी' याचं पेश्शल ट्रेनिंग घ्या. म्हणजे आणखी काव्यालंकार तयार करता येतील!
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 04/07/2011 - 17:02 नवीन
आजकाल येगळाच मूड दिसतोय! विडंबन जमले आहे. लवकरच विडंबनाचार्य पदवीप्रदान समारंभ करण्यात येइल. बाथरूमचा कडाकोयंडा या जागी बाथरूमचा तो कडीकोयंडा असे असले तर?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/07/2011 - 17:13 नवीन
लंब्या, लेका बिघडलासच बघ आता. आता तुला ह्यावर काही इलाजच नाही. :D अवांतरः शरदिनीच्या कविता नीट पहा, पंचाक्षरी शब्दांचे नादमाधुर्य अभ्यासावेस असा माझा आपुलकीचा सल्ला. ;)
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग गुरुवार, 04/07/2011 - 19:02 नवीन
शक्य तितका प्रयत्न केला पण इतके पंचाक्षरी शब्दच सापडेनात :P.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्राजु Fri, 04/08/2011 - 04:58 नवीन
कडाडकडकड शब्द धरपकड!! चालुद्या! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग
म
मुलूखावेगळी गुरुवार, 04/07/2011 - 17:15 नवीन
लय भारी रे
  • Log in or register to post comments
छ
छ्छुंदरसिंग गुरुवार, 04/07/2011 - 17:31 नवीन
ग्लेन्मोरेन्जी म्हन्जे काय रे,भाऊ? -छ्छु
  • Log in or register to post comments
अ
असुर Fri, 04/08/2011 - 16:57 नवीन
ग्लेन्मोरेन्जी हे मद्यान्नीला घ्यावयाचे एक तीर्थ आहे. एकाच प्रकारच्या धान्यापासून बनवलेले आणि प्रक्रिया करुन शुद्ध केलेले हे तीर्थ घेतल्यावर बर्‍याचजणांची मद्यानंदी टाळी (कॉरा: परा) लागते हा चक्षुचक्षुमेवसत्य: अनुभव आहे. काही लोक यासोबत अनेक प्रकारचा प्रसादही सेवन करतात हे विशेष!! अधिक माहीतीसाठी गणपा-नाटक्या या जगप्रसिद्ध जोडगोळीला भेटावे. ते सर्वांना शहाणे करुन सोडण्यात पटाईत आहेत. --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छ्छुंदरसिंग
प
प्रीत-मोहर गुरुवार, 04/07/2011 - 17:36 नवीन
लंब्या सही रे !!!!
  • Log in or register to post comments
५
५० फक्त गुरुवार, 04/07/2011 - 19:10 नवीन
मस्त रे लंब्या, मस्त चालु दे.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 04/07/2011 - 21:53 नवीन
जम्तंय जम्तंय... अर्थपूर्ण वाटल्याने थोडी नशा कमी झाली इतकेच...
  • Log in or register to post comments
न
निशदे गुरुवार, 04/07/2011 - 23:45 नवीन
<<मूळ कवितेप्रमाणे एकमेकांशी संबंध नसलेली कडवी लिहीण्याइतकी माझी दांडगी प्रतिभा नाही.>> ही सुद्धा उत्तम जमली आहे. असाच प्रयत्न करत राहिलात तर मूळ कवितेएव्हढे उत्तम सुद्ध फाड्फाड लिहायला लागाल...... "खरडत खुरडत सावरि धोत्रा त्रेधा तिरपिट विचित्र मुद्रा बाथरूमचा कडाकोयंडा जाईजाईस्तो घडे अभद्रा" अनेक आठवणी जाग्या झाल्या.....असो........;)
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Fri, 04/08/2011 - 04:00 नवीन
मस्त रे... --टुकुल
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 04/08/2011 - 05:14 नवीन
छ्या हे फारच अर्थसंगत आहे. अर्थसंगतीतून विडंबन असेल तर गोष्ट वेगळी. त्यामुळे चान चान असे म्हणतो.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 04/08/2011 - 05:59 नवीन
पहिल्या धारेचं विडंबन. अजून अनाकलनियता वाढविण्यासाठी मास्तरांचा (भडकमकर) क्लास लावा ही सूचना. ह्याला म्हणतात 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.' ( टार्‍याएवढी आमची नाहीये...प्रतिभा हो)
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Fri, 04/08/2011 - 06:09 नवीन
खत्रुड !
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 04/08/2011 - 07:47 नवीन
शेवटी ......... फॉककन् टाकुन मोकळा झालास तर :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा