Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रस्त्यानं रेतीवाला तो आला

प — पाषाणभेद, Fri, 04/08/2011 - 01:13
रस्त्यानं रेतीवाला तो आला

रस्त्यावर उभी मी उन्हातान्हाची टमटम येत नाही कधीची येईल का कोनी गाडीवाला नेईल का मला कोनी घरला प्रश्न मला पडला, पडला, पडला तो बघा, तो बघा, रस्त्यानं रेतीवाला तो आला ||धृ|| मी गोरी पोरी कोल्याची हाय देखणी लई सुंदर रंगानं काळी मी पडल उन्हात उभी राहील्यावर वेळेवर मदतीला धावला तो बघा, तो बघा, रस्त्यानं रेतीवाला तो आला ||१|| गाडी रेतीनं हाय भरलेली लाल रंगानं हाय सजवलेली मला भुरळ तीची पडली सार्‍या गाड्यांमधून आवडली तिच्यामधे घेवून जायला तो बघा, तो बघा, रस्त्यानं रेतीवाला तो आला ||२|| रेवदांड्याच्या गणपाचा मैतर तो आज आला माझ्या भेटीला लई दिसानं ह्यो दिसला नाही सोडणार मी त्याला जावू लवकर कोलीगीतावर नाचायला तो बघा, तो बघा, रस्त्यानं रेतीवाला तो आला ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०८/०४/२०११

प्रतिक्रिया द्या
1228 वाचन

💬 प्रतिसाद (2)
आ
आनंदयात्री Fri, 04/08/2011 - 01:48 नवीन
वाह वाह मस्त !! आमचा गणपा रेवदांड्याचा माहिती नव्हते. - आंद्या रेतीवाला
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/08/2011 - 04:40 नवीन
दफोराव (पाषाणभेद=दगडफोड्या=दफोराव) हल्ली लयं जोरात हायसा... ;) बाकी मला रेतीवाला नवरा कराव पाहिजे गाणं ऐकलं का ? http://www.youtube.com/watch?v=KB2Ve0y3ys0 जाता जाता :--- महाराष्ट्रात रेतीवाला म्हंटले की लोक घाबरतात, कारण अवैद्य रेतीउपस्याला विरोध म्हणजे अंगावर ट्रक्टर/ट्रक चढवुन घेणे हे समिकरणच आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा