Skip to main content

ठाणे कट्ट्यावर उतारा....

लेखक कुंदन यांनी शुक्रवार, 08/04/2011 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
एका स्पाम मेल मध्ये ठाणे कट्ट्याचा मेनु पाहिल्यापासुन अंमळ त्रास होत होता. विकांताचा सदुपयोग करावा म्हणुन मग शेव भाजी न चपाती चा एक प्रयत्न करुन पाहिला. भाजी साठी साहित्यः १ वाटी सुके खोबरे. १ मोठा कांदा. २ मिरच्या २ लसुण पाकळ्या ( सोलुन) छोटा आल्याचा तुकडा १/२ टि स्पुन लाल तिखट १ टि स्पुन मसाला. १ वाटी लाल शेव सुके खोबरे लालसर भाजुन घेणे. कांदा साफ करुन तो देखील मिरच्यांबरोबर भाजुन घेणे. भाजलेले वरील जिन्नस , तिखट , मसाला , हळद ई. मिक्सर मधुन फिरबुन घेणे. एका कढईमध्ये तेल तापवत ठेवणे. तेल चांगले तापले की जिरे - मोहोरी टाकणे. मग मिक्सर मध्ये वाटलेला मसाला या गरम तेलात मस्त परतवा. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालुन , कढईवर झाकण ठेवावे. अधुन मधुन झाकण उचलुन चांगली उकळी आलीये की नाही हे बघावे. मस्त उकळी आली की , शेव टाकावेत अन ग्यास बंद करुन कढईवर झाकण ठेवावे. Shev Bhaji मागच्या वेळी "मसालेदार हरबरा बटाटा उसळ" अंमळ जास्त लालसर दिस्त होता , म्हणुन यावेळी तिखट जरा कमी टाकलेय. म्हणुन यावेळी नीट रंगली नाही भाजी. जरा समजुन घ्यावे.

वाचने 6800
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

मागच्या वेळी "मसालेदार हरबरा बटाटा उसळ" अंमळ जास्त लालसर दिस्त होता , म्हणुन यावेळी तिखट जरा कमी टाकलेय.
दुसर्‍या दिवशी जाळ निघाल होता ना रे. खर सांग. ;)
जरा समजुन घ्यावे.
भापो कुंद्या. :)

तु का अंमळ जळजळ करतो आहेस रे ..;) २१ ला आहेस ना ठाण्यात , तु आला की उडवु या की बारी ...आपल हे ...बार ;) असो ..शेव असे मॅगी सारखे का दिसत आहेत ? ;) बाकी छान प्रयत्न !

In reply to by कुंदन

आम्ही पक्का इडियट आहोत हे आम्हाला माहित आहे आणि ते आम्ही आधीच जाहिर केले आहे. कृपया त्यावरुन टोमणे मारू नये ही नम्र आणि आग्रहाची विनंती. धन्यवाद.

गणपा, निवेदिता वगैरे मंडळीना कॉम्प्लेक्स देणार तू हळूहळू! पण मागच्या वेळसारख्या कुंदन पेश्शल सूचना आणि 'क्रमशः' याचा अभाव जाणवला!

>>फिरबुन घेणे. म्हणजे काय रे भौ?? यावेळी नीट रंगली नाही भाजी. जरा समजुन घ्यावे. हम्म! एकदा लाल भडक, एकदा पिवळी धमक.. एकदा कच्चीच भुर्जी(तिचा पुढचा भाग आला नाही म्हणून)...! आणि शेवटी म्हणे 'घ्या समजून'. बरं तर बरं नुसता कच्चा माल दाखवून 'घ्या करून" असं नाही म्हणाला. आवांतर : फोटो छान.

In reply to by प्राजु

>>'घ्या समजून'. बरं तर बरं नुसता कच्चा माल दाखवून 'घ्या करून" असं नाही म्हणाला. हाहाहा =)) =))

In reply to by प्राजु

पा. कृ. मध्ये "क्रमशः" प्रथमच बघत असल्याने तुमचा अंमळ गोंधळ झालेला दिसतोय. ;-)

ठाण्याच्या धनगरी मटण जेवणात असलेल्या कट्ट्याला हा शेवभाजीचा उतारा.. छे छे.. काय हे कुंदन शेट.. :) असो बाकी प्रयत्न चांगला आहे. :)

In reply to by मराठमोळा

हे बघा , म मो सायेब. उपलब्ध असलेल्या साधन सामग्री मध्ये वेळात वेळ काढुन बनवलेली ही भाजी आहे. खायची तर खा , नाही तर पाणचट इडल्या आहेतच ( संदर्भ : चेन्नई पुणे चेन्नई -- भाग -२ ) ;-)

In reply to by कुंदन

>>नाही तर पाणचट इडल्या आहेतच टाका.. जखमेवर मीठ टाका.. ;) त्या ईडल्यांपेक्षा कोणतीही महाराष्टीयन डिश केव्हाही चांगली.. :)

In reply to by प्राजु

नुसताच बचक भर गोडा मसाला ही महाराष्ट्रीयन डिश आहे ?? कुठे बनते ??

वा वा ! सध्या कुंदोपरावांचा 'मिसेस तेंडुलकर' झालेला दिसतोय ;) पाकृ च्या कडेला ग्लेन फिडिच वैग्रे न दिसल्याने अंमळ दु:ख दाटुन आले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

एका हिंदी मालिकेची मराठी सं स्थळावर जाहिरात करण्याचा क्षीण प्रयत्न.

पा.कृ. क्रमाशः करायची राहिली की काय? अवांतर : फोटोवरून तुम्हीच केलेली दिसतेय! छान ! मस्त प्रयत्न!!