पाककृती

मेथांबा

Primary tabs

साहित्यः २ कप कैरीची सालं काढून केलेले तुकडे १ कप चिरलेला गूळ १ टीस्पून मोहरी १ टीस्पून मेथीदाणे १ टीस्पून लाल तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे) चिमूटभर हिंग (फोटोत साहित्यासाठी चमच्यात हिंग दाखविले आहे) :) मीठ चवीप्रमाणे तेल Image removed. पा़कृ: जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी व मेथीदाणे टाकावे. तडतडले की त्यात हिंग घालावे. Image removed. त्यात कैरीचे तुकडे, लाल तिखट व मीठ घालावे. गरज वाटल्यास २ टेस्पून पाणी घालावे व शिजु द्यावे. Image removed. कैरी मऊ झाली की त्यात गूळ घालावा व मिश्रण थोडे घट्ट होऊ द्यावे. Image removed. गार झाले की मेथांबा हवाबंद डब्यात / बर्णीत भरावा. ७-८ दिवस टिकतो पण फ्रिजमधे ठेवावा लागतो. Image removed.
दीविरा

आवडले :)

शेवटचा फोटो छान

लगेच खायला घ्यावे असे वाटले.

मदनबाण

आयला !!! हे काही तरी नविन दिसतय बाँ... खी खी खी. चला मला यक नविन प्रकार समजला. :)
पण मी हा प्रकार अजुन चाखलाच नाय ना !!! छ्या.
असो. पहिला फोटु मस्त आलाय ( अगदी हिंगा सकट हो.);)

(आंबा प्रेमी) :)

अनामिक

मागच्याच आठवड्यात केलाय मेथांबा! मस्तं लागतो!!

प्राजु

सॉल्लिड लागतो मेथांबा..!
खूप आवडतो. फोटो क्लास आला आहे.

मस्तच........मला खूप खूप आवडतो...

तयार मेथ्यांब्याचा फ़ोटो मस्त....लगेचच खावे असे वाटतेय

रेवती

मला तोंडीलावणे म्हणून आवडतो.
काहीजणांना अगदी भाजीऐवजीही आवडतो तितका नाही आवडत.
अगदी जोरदार उन्हाळ्यात मेथांबा आणखी छान वाटतो.

योगप्रभू

मेथांब्याच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटले.

कर्‍हाडे ब्राह्मण घरांतील गृहिणींची स्वयंपाकातील एक खासियत म्हणजे मेथांबा, असे पूर्वी ऐकिवात होते.

सगळ्यात शेवटचा फोटो बघून समाधान झाले. मेथांबा समोर यावा तो असा. ताटात उगा बोटभर तोंडी लावण्यात काही मजा नाही.

निवेदिता-ताई धन्यवाद मेथांबा करून प्रतिक्रिया दिल्याबद्दल :)
सगळयांचे आभार :)

sneharani

मस्त दिसतोय मेथांबा!

डावखुरा

सध्या घरीपण कैरीचा गोडड भडिमार आहे..त्यामुळे नाहीतर ईनो घ्यायची पाळी आली असती...

आज काही खरं नाही , सगळ्यांनीच बनवला वाटते मेथांबा :)
खूप खूप छान आणी आभार :)

स्मिता.

मला पण खूप आवडतो मेथांबा. सगळ्यांनी टाकलेले फोटो बघून तोंडाला पाणी सुटले.
मल पण इकडे कुठे कैरी मिळते का बघायला हवे.

गणेशा

भारी पाकृ.

माहित नव्हती !

सेव्ह केली आहे.

विनटूविन

मी हा वर्षभर (फ्रिजमध्ये अर्थात)टिकवलाय आणि मस्त टिकला आणि अतिशय चवदार झाला.