पाककृती
मालवणी मसाला.
Primary tabs
साहित्यः-पाव किलो लाल सुक्या मिरच्या,१२५ ग्रॅम धणे,३ चमचे काळी मिरी,५ ग्रॅम लवंगा,२ चमचे जिरे,
२ चमचे शहाजिरे,अंदाजे २-२ चमचे प्रत्येकी दालचिनी,मसाल वेलची,दगड्फूल,२ हलकुंडाचे तुकडे.
कॢती:-मिरच्या सोडून सर्व पदार्थ मंद विस्तवावर कोरदे भाजा.लाल मिरच्या थोद्या तेलावर परतून घ्या.
सर्व एकत्र कुटून घ्या.मसाला तय्यार्.बरणीत भरताना थोडे जाडे मिठ घाला.म्हणजे खराब होणार नाही.
पण हा मसाला फक्त मालवणी पदार्थालाच वापरायचा का??????
मी ही हेच विचारते मसाला कशा-कशात वापरू शकतो??
मासे, चिकनंमधे वापरायचा
निवेदिता-ताई,सनिकास्वप्निल्:-हा मसाला कुठल्याही भाजीत किंवा मसाल्याच्या आमटीसाठी वापरु शकतो.
RUPALI POYEKAR:-हा मसाला तिसर्या,मोरी,मटण,चिकन यासाठी वापरु शकतो.