आज ही गेले
आज ही गेले काल मधे जमा झाले
आठवणींच्या पेटित असे बंद झाले!!
न आठवलो मी कुणास आजही
न कुणी मज आज भेटीस आले!!
बघून आभाळ खिडकी तुन म्हणतो मी
चला दिवस अजुन एक कमी झाले!!
अनवाणी चालतांना टोचले जर पायी
अजुन एक घाव, नवीन काय झाले!!
कुणी ठेवले नाव मज, तिच्या नावानं
नाव असे झालेच, तर निनाव काय झाले!!
आज ही गेले काल मधे जमा झाले
आठवणींच्या पेटित असे बंद झाले!!
💬 प्रतिसाद
(1)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/11/2011 - 08:22
नवीन
निनाव,
अतिशय सुंदर रचना!!!
त्यातल्या त्यात
ह्याला तर तोड नाही.
- Log in or register to post comments