Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सरसरणारे यौवन तुझे ते

न — निनाव, Mon, 04/11/2011 - 21:17
सर सर सर सर थेंब गालावर ओले मोती ते ओघळणारे पडता पडता थेट तुझ्यावर मन माझे ते जळणारे थांबायचे? सरकायचे? प्रश्न त्यास पडले भिजवायचे-लाजवायचे मनी असे ठरले केसांमधुनी ओठांवरती थेंब ते कोसळणारे श्वासांमधल्या गंघामधुनी प्रेम ते दरवळणारे बोलायचे? न बोलायचे? प्रश्न त्यास पडले भुलवायचे, भिजवायचे मनी असे ठरले लाजत लाजत गुलाबी मनावर नाजुक इतुके ओठ लाजणारे येताच जवळ मी होत बांवरे गोड भितीनं ते थरथरणारे स्पर्शायचे? फुलवायचे? प्रश्न त्यास पडले पाहायचे, साठवायचे मनी असे ठरले उन्मद लाटा हरवुन वाटा किनार्यावर आदळणारे सोडत बंधन हळुच सारे तन तुझे आज पाघळणारे नेसायचे? सावरायचे? प्रश्न त्यास पडले जपायचे, लाडवायचे मनी असे ठरले सरसरणारे यौवन तुझे ते घायळ मज करणारे भिजल्या अंगी श्वास तुझे मनी वणवा ते करणारे पेटवायचे? विझवायचे? प्रश्न असे पडले जळायचे, स्मरायचे मनी असे ठरले सर सर सर सर थेंब गालावर ओले मोती ते ओघळणारे पडता पडता थेट तुझ्यावर मन माझे ते जळणारे

प्रतिक्रिया द्या
1873 वाचन

💬 प्रतिसाद (10)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 04/12/2011 - 08:05 नवीन
निनाव, उत्तम रचना!! खरच अप्रतिम... फक्त एक प्रश्नः 'सरसरणारे यौव्वन' ?? तुम्हाला 'सळसळणारे यौव्वन' म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 04/12/2011 - 08:15 नवीन
मिका: आभार. शंका बरोबर आहे. परंतु, ही संपुर्ण कविताच पावसाच्या थेंब आणिक तिच्या तरुणाई ला जोडुन दाखविणारी अस्ल्या कारणानं 'सरसरणारे' हे शब्द 'पावसाच्या सरीं' ना तिच्या यौवानाचे प्रतिक म्हणुन वापरण्याचा प्रयत्न केला आहे - म्हणुन 'पावसाच्या सरींप्रमाणे' 'सर सरणारे यौव्वन' असे संबोधले आहे. आशा आहे कि तुम्हाला हा आशय आवडला असावा. (नेहमीच) वेळ काढून कविता वाचल्यास आणिक इतुक्या वेळेत प्रतिसाद देण्या बद्दल - :) - आ. निनाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
प
प्रकाश घाटपांडे Tue, 04/12/2011 - 10:18 नवीन
चुकुन मी सरासरी येणारे यौवन तुझे असे वाचले. नुकताच उपक्रमावर जाउन आल्याचा परिणाम :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाव
न
निनाव Tue, 04/12/2011 - 11:16 नवीन
:) कुठे जाउन आलात? समुद्र किनारी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 04/12/2011 - 13:32 नवीन
सरासरी पहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाव
न
निनाव Tue, 04/12/2011 - 10:37 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
ग
गणेशा Tue, 04/12/2011 - 11:10 नवीन
कविता छानच .. एकदम आवडली .. कुठल्या ओळी विशेष आवडल्या तर संपुर्ण कविताच पुन्हा येथे द्यावी लागेल असे वाटले म्हणुन नाही दिली.. लिहित रहा .. वाचत आहे..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 04/12/2011 - 11:10 नवीन
कविता छानच .. एकदम आवडली .. कुठल्या ओळी विशेष आवडल्या तर संपुर्ण कविताच पुन्हा येथे द्यावी लागेल असे वाटले म्हणुन नाही दिली.. लिहित रहा .. वाचत आहे..
  • Log in or register to post comments
स
सांजसखी Tue, 04/12/2011 - 13:29 नवीन
छान !! कविता आवडली :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Tue, 04/12/2011 - 14:03 नवीन
निनाव -मस्त भन्नाट !! सर सर सर सर थेंब गालावर ओले मोती ते ओघळणारे पडता पडता ते थेट तुझ्यावर मन माझे ते जळणारे एवढे मस्त लिहिलेस की ह्या मस्तपणाचे मग बंधन होऊन जाईल
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा