वावर
असे पुरुष,
पहिल्यांदा मेहेंदीने सजलेले हात आणतात तेव्हा
बराच काळ ठेवतात त्यांना सजवलेल्या मखरातून
असूयेने बघणाऱ्या नजरांचा काउंटर जितका जास्त
तितकी असते त्यांची अभिमानाची लिंग-कॉलर ताठ
असे पुरुष,
शिकवलेले असते त्यांना लहानपणापासून
पाहिलेले असते त्यांनी,
काका, मामा आणि बापाला सफाईदारपणे
आणलेले हात वापरताना...
साला ते चुकत नाहीत
शेंडीला गाठ मारून घोकतात सगळ्या ऋचा
घेतात कानमंत्र बापच्या मांडीवर
असे पुरुष,
निवडतात हात परंपरेने घडवलेले
लॉस्ट अत्मभान मेथड; परफेक्टेड ओव्हर सेंचुरीज
चकाचक घर, रुचकर स्वैपाक, मैथुनी शृंगार
साला सगळे चोख
रगड रगड रगडतात आणलेले हात
आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर
उभे करतात दारामागच्या कोपऱ्यात
केरसुणीसारखे.
असे पुरुष,
कोरतात कोपर्या पर्यंतचे हात
मेल्यानंतर सतीच्या दगडावर
कधी एक, कधी दोन, कधी अधिक
जेव्हढे जास्त हात तेव्हढे जास्त कर्तबगार
काल विंचरताना आत्म्यातील अडगळ
जाणवला अशा पुरुषाचा वावर...
माझ्या व्यक्त होण्यात दिसतात अचानक कधी
त्याच्या अभद्र सावल्या...
मी कँसर रोखण्याचे उपाय वाचू लागतो...
💬 प्रतिसाद
(8)
न
नगरीनिरंजन
Tue, 04/12/2011 - 04:36
नवीन
काल विंचरताना आत्म्यातील अडगळ
जाणवला अशा पुरुषाचा वावर...
माझ्या व्यक्त होण्यात दिसतात अचानक कधी
त्याच्या अभद्र सावल्या...
मी कँसर रोखण्याचे उपाय वाचू लागतो...
मनाला भिडलं मुक्तक! हजारो वर्षांच्या आर्य परंपरेच्या बेडकीवर पोसलेला जो गंडसर्प अजूनही समाजशरीराला विळखा घालूनच आहे त्याच्या फुत्कारांविरुद्ध असे जितके उद्गार निघतील तेवढं चांगलं.
शब्दरचना सुंदर आहे. अजून लिहा.
- Log in or register to post comments
ड
डीलर
Tue, 04/12/2011 - 06:43
नवीन
आवड्ले! नेमक्या शब्दात परीणामकारक रचना.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 04/12/2011 - 11:14
नवीन
अप्रतिम ...
- Log in or register to post comments
व
विसुनाना
Tue, 04/12/2011 - 11:21
नवीन
या कल्पना आवडल्या. कविता आवडली.
- Log in or register to post comments
प
प्रकाश१११
Tue, 04/12/2011 - 14:06
नवीन
असे पुरुष,
निवडतात हात परंपरेने घडवलेले
लॉस्ट अत्मभान मेथड; परफेक्टेड ओव्हर सेंचुरीज
चकाचक घर, रुचकर स्वैपाक, मैथुनी शृंगार
साला सगळे चोख
रगड रगड रगडतात आणलेले हात
आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर
उभे करतात दारामागच्या कोपऱ्यात
केरसुणीसारखे.
उत्तम.जमलेय !!
- Log in or register to post comments
A
ajay wankhede
Tue, 04/12/2011 - 15:35
नवीन
मी कँसर रोखण्याचे उपाय वाचू लागतो...नुस्ता उपाय वाचुन चालणार नाहि राव्..जालिम औष धच लागेल.या कर्कास
- Log in or register to post comments
प
प्राजु
Tue, 04/12/2011 - 22:32
नवीन
क्या बात है!!! सॉल्लिड!
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Wed, 04/13/2011 - 15:34
नवीन
ट्रेन्ड पुरुषी अहंकाराची आत्मानुभूती आवडली
- Log in or register to post comments